Devendra Fadnavis : संजय राऊत कोण आहेत?, त्यांच्या प्रश्नांना मी का उत्तर देऊ?; फडणवीसांचा मीडियालाच सवाल
शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला. संजय राऊत रोजच टीका करतात. आम्ही महत्त्व देत नाही. त्यांच्यावर भाष्य करायला ते महत्त्वाचे नाही. पुन्हा सांगतो. संजय राऊत कोणी महत्त्वाचे आहेत का?
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत म्हणाले, संजय राऊत हे रोजच टीका करतात. ते महत्वाचे माणूस नाहीत. संजय राऊत हे काही महत्त्वाचे आहेत का. तुमच्याकडं स्वतःचे प्रश्न असतील, तर मला विचारा. संजय राऊतांच्या प्रश्नांवर मी उत्तर का देऊ ते कोण आहेत एवढे मोठे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मीडियालाच केला. संभाजीराजेंवर (Sambhaji Raje) देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांना राज्यसभेवर पाठविलं होतं. आता भाजपचं (BJP) समर्थन राहील की नाही, याचा निर्णय हा राज्यस्तरावर (Rajya Sabha) होत नाही. असा निर्णय हा केंद्रस्तरावर होतो. केंद्राचा जोकाही निर्णय होईल तो आम्ही सांगू, असं फडणवीस यांनी सांगितलं.
आस्थेचा विषय हा राजकारणाच्या पलीकडचा
ज्ञानवापीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा आस्थेचा विषय आहे. आस्थेचे विषय हे राजकारणाच्या पलीकडं असतात. देशामध्ये हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडविले जातात. आज न्यायालयानं त्याठिकाणी कोर्ट-कमीशनर अपाईंट केला. कोर्ट कमीशनरचा रिपोर्ट येईल. त्याच्या आधारावर जोकाही न्यायालय निर्णय देईल. तो अत्यंत महत्त्वाचा असेल. आता न्यायालयात हे सगळं प्रकरण सुरू आहे. त्यामुळं त्यावर फार विवाद करणं योग्य नाही. पण, मंदिरांवर आक्रमण करून कशाप्रकारे ते तोडलं होतं. हा इतिहास सर्वांना माहीत आहे.
संजय राऊत कोण आहेत?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला. संजय राऊत रोजच टीका करतात. आम्ही महत्त्व देत नाही. त्यांच्यावर भाष्य करायला ते महत्त्वाचे नाही. पुन्हा सांगतो. संजय राऊत कोणी महत्त्वाचे आहेत का? तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर सांगा त्यावर उत्तर देईल. संजय राऊत कोण आहेत? त्यांच्या प्रश्नावर मी का उत्तर देऊ, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला केला.