Shivsena : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचा प्रतोद कोण? भावना गवळी की राजन विचारे? संभ्रम कायम

सोमवारपासून संसदीय पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामध्ये शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण असा सवाल उपस्थित होत आहे. कारण प्रतोदपदी असलेल्या भावना गवळी ह्या आता एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सावध पवित्रा घेत खा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे पत्र लोकसभा सचिवालयांकडे दिले होते. मात्र, कोर्टाच्या निर्णयापर्यंत आता सचिवालयाने 'वेट अॅण्ड वॉच' ती भूमिका घेतलेली आहे.

Shivsena : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचा प्रतोद कोण? भावना गवळी की राजन विचारे? संभ्रम कायम
खा. भावना गवळी, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि खा. राजन विचारे
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 2:48 PM

मुंबई : विधानसभेत बहुमत चाचणीच्या दरम्यान (Shivsena) शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण असा सवाल उपस्थित झाला होता. आता हीच स्थिती (Parliamentary session) संसदेतील पावसाळी अधिवेशनात निर्माण होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण खा. भावना गवळी ह्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी खा. राजन विचारेंची नियुक्ती होण्याचे पत्र (Lok Sabha Secretariat) लोकसभा सचिवालयाकडे खा. संजय राऊत यांनी दिले होते. मात्र, यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सोमवारपासून सुरु होत असलेल्या संसदीय पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचा प्रतोद कोण ? हा पेच निर्माण झाला आहे. विधानसभेतील चित्र स्पष्ट होत नसताना आता लोकसभेतील प्रतोद पदावरुन पुन्हा एकदा सेनेची कोंडी झाली का असा सवाल उपस्थित होत आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

सोमवारपासून संसदीय पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामध्ये शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण असा सवाल उपस्थित होत आहे. कारण प्रतोदपदी असलेल्या भावना गवळी ह्या आता एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सावध पवित्रा घेत खा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे पत्र लोकसभा सचिवालयांकडे दिले होते. मात्र, कोर्टाच्या निर्णयापर्यंत आता सचिवालयाने ‘वेट अॅण्ड वॉच’ ती भूमिका घेतलेली आहे. याबाबत कोणतीही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सोमवारी पावसाळी अधिवेशनात शिवसेना प्रतोद म्हणून कुणाची उपस्थिती दर्शविणार हा मोठा प्रश्न आहे. याबाबत ज्यांची शिफारस केली त्यांना प्रतोद पद हे मिळालेले नाहीत तर भावना गवळी नेमक्या काय करणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राज्याच्या राजकारण, परिणाम देशाच्या राजधानीत

शिवसेनेतील आमदारांनी केलेले बंड सत्तांतराच्या माध्यमातून संपुष्टात आले असले तरी त्याचे परिणाम मात्र, कायम आहेत. कारण राज्यात आमदार, जिल्हा प्रमिख, नगरसेवक हे एवढेच शिंदे गटात सहभागी होतात असे नाही तर आता खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात आमदारांचे झालेले बंडाचे लोण आता राजधानी दिल्लीपर्यंत जाऊन ठेपले आहे. खासदारांच्या या भूमिकेमुळे प्रतोदपदी कोण हा सवाल उपस्थित झाला आहे. शिवाय लोकसभा सचिवालयाने याबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याने यामधील तिढा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून

सध्या शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामधला वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. यामध्ये प्रतोद पदाचाही विषय आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार यावरच लोकसभा सचिवालय आपली भूमिका ठरविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.