मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा (Who is Shivsena leader Sanjay Rathod accused in Pooja Chavan suicide case).
संजय राठोड बंजारा समाजातून येतात. शिवसैनिक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या संजय राठोड यांनी काँग्रेसच्या गडामध्येच कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांना यवतमाळचं शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाही मिळालं. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी झंझावाती पक्ष बांधणी करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना रुजवली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा दारुण पराभव केला आणि काँग्रेसच्या गडावर भगवा झेंडा फडकावला.
2009 मध्ये देखील संजय राठोड यांनी काँग्रेसचे तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. यावेळी त्यांच्या विजयातील मताधिक्य नजरेत भरणारं होतं. राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या मोजक्या 5 आमदारांमध्ये संजय राठोड यांचा समावेश होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 8 8,6464 च्या विक्रमी फरकाने ते जिंकले, जे महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे आहे.
2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत घुईखेडकर यांचा पराभव करून राठोड यांनी हॅटट्रिक साधली. गेल्या 2019 मध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख आव्हान उभे करतील, अशी चर्चा होती. मात्र, या निवडणुकीतही राठोड यांनी तब्बल 60 हजारांवर मते घेऊन सलग चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. सतत मतदारांच्या संपर्कात असणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.
ते 2004 ते 2019 या काळात सलगपणे विधानसभेवर निवडून जात आहेत. त्या ताकदीवर त्यांनी शिवसेनेचा आमदार ते थेट कॅबिनेटमंत्री असा प्रवास केलाय. सध्या ते राज्याचे वनमंत्री आहेत.
कोणत आहेत संजय राठोड?
हेही वाचा :
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजप आक्रमक; संजय राठोड नॉट रिचेबल
चित्रा वाघ कडाडल्या, “वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”
व्हिडीओ पाहा :
Who is Shivsena leader Sanjay Rathod accused in Pooja Chavan suicide case