Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतायत, मग योग्य कोण?’

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. | Devendra Fadnavis Jayant Patil

'पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतायत, मग योग्य कोण?'
जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 7:35 AM

मुंबई: सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नुकतेच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक करण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सरकारवरील टीकेचा सूर कायम आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. (NCP leader Jayant Patil take a dig at Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटला रिप्लाय देताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी फिरकी घेतली. देवेंद्र फडणवीसजी आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?, असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यावर काय बोलणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली?

राज्यात 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणात येणाऱ्या अडथळ्यांविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालायने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मुंबई महापालिकेने केलेल्या प्लानिंगचं कौतुक केलं होतं. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची ही चर्चा महत्त्वाची मानली जात होती. दोन्ही नेत्यांनी आज केलेल्या चर्चेचे आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील, असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाल्याचं कळतं. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, 18 वर्षांवरील व्यक्तिंचं लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंवर पंतप्रधानांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती पंतप्रधानांना अवगत करतानाच राज्यांच्या गरजाही पंतप्रधानांसमोर मांडल्याचं कळतं.

‘मुंबई मॉडेल’ची सुप्रीम कोर्टाकडून प्रशंसा

सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात ऑक्सिजन व्यवस्थापनाबाबत मुंबईतील यंत्रणांचे कौतुक केले होते. मुंबईत आतापर्यंत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईतील उपलब्ध ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग, चांगल्याप्रकारे वितरण आणि बफर स्टॉक तयार करणे यासह बीएमसीची विद्यमान संसाधने एकत्रित करण्याच्या क्षमतेमुळेच मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहास झाला आहे.

16 आणि 17 एप्रिलच्या मध्यरात्री 6 शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खूप कमी झाला होता. तेव्हा 168 रुग्णांना तातडीने जम्बो कोविड सेंटरच्या कार्डिएक रुग्णवाहिकेत शिफ्ट करण्यात आले. त्यामुळे सगळ्यांचे जीव वाचविण्यात यश आलं. या घटनेनंतर 17 एप्रिलला बीएमसीने राज्य टास्क फोर्सकडे ऑक्सिजन वापरासाठी प्रोटोकॉल बनविण्याची मागणी केली.

ऑक्सिजनचे कोणतेही प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी केंद्रात पोस्टिंग दरम्यान काम केलेल्या अधिकाऱ्यांशी दिल्लीत संपर्क साधला. यावेळी कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव, आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील आठ शीर्ष राजकारण्यांना ही याबाबत संदेश दिला. ऑक्सिजन आयात करण्यासाठी केंद्राला सूचनाही देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा, पीआर यंत्रणांमार्फत जनतेची दिशाभूल नको: देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक, कोरोना रोखणारं मुंबई मॉडेल काय? BMC ची War Room कसं काम करते?

“देवेंद्र फडणवीस हेच आभासी”, मुंबईच्या कोरोनास्थितीवर टीका केल्यामुळे शिवसेनेचा पलटवार

(NCP leader Jayant Patil take a dig at Devendra Fadnavis)

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.