मुंबई : (Eknath Shinde) मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांचा (Swearing-in ceremony) शपथविधी सोहळा छोट्या खानी उरकण्यात आला असला तरी आता मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रम दणक्यात होणार आहे. त्याअनुशंगाने सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. यासंबंधी आपल्याला निमंत्रण नसल्याचे (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुपारीच स्पष्ट केले होते. मात्र, रात्री उशीरा विरोधी पक्षातील नेत्यांना तसेच (Central Minister) केंद्रीय मंत्र्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांची तर उपस्थिती लाभणारच आहे पण अनेकांना निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील निमंत्रण आहे पण त्यांच्या नियोजित दौऱ्यामुळे ते उपस्थित राहणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे.
मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे सरकारकडून केंद्रीय मंत्र्यांना तर निमंत्रण देण्यात आले आहेच पण विरोधी पक्षातीलही काही नेते हे निमंत्रित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून याची जोरदार तयारी सुरु असून उद्या भाजपाचे आणि शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांना निमंत्रण आहे तर विरोधी पक्षनेते अजित पवार, भारती पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सोमवारी दुपारी विचारणा झाली असता उद्या मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याची ऐकीव माहिती आहे असे ते म्हणाले होते. शिवाय आपल्याला आमंत्रण मिळाले नसल्याचेही ते म्हणाले होते. पण कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह केंद्रीय नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.
शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ आणि संदिपान घुमरे यांना फोन गेल्याचे समजत आहे. तर भाजपाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश आहे.