शिवसेनेची बुलंद तोफ कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

भाजप-शिनसेनेचा प्रत्येक मंत्री काम करतो. आमचे सर्व मंत्री व्यवस्थित काम करतात. तेच तुम्हाला न्याय देतील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

शिवसेनेची बुलंद तोफ कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
एकनाथ शिंदेंचे डुप्लीकेट विजय मानेंची हायकोर्टात धावImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 6:50 PM

अनिल केऱ्हाळे

जळगाव : मुख्यमंत्री (Chief Minister ) एकनाथ शिंदे आज जळगावात होते. यावेळी सभेत बोलताना शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील यांना पाणी खातं दिलं. 22 हजार योजना मंजूर करण्याचा इतिहास गुलाबरावांनी केला. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शिवसेनेची तोफ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जळगाव येथील सभेत सांगितलं. ते म्हणाले, मी गुलाबरावांचा चाहता आहे. मी त्यांचं भाषण ऐकायला उत्सुक असतो. शिवाजी पार्कवर भाषण द्यायचे तेव्हा ते लोकांमध्ये चैतन्य निर्माण करायचे. पण, त्यांचं भाषण बंद करण्यात आलं होते. एकनाथ शिंदे अशा कोत्या मनाचा कार्यकर्ता नाही. कार्यकर्त्यांना मोठा करणारा नेता असल्याचं ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पाळधी शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते.

शिंदे गटाच्या 50 लोकांची दखल पूर्ण जगानं घेतल्याचं मुख्यमंत्री सभेत बोलताना म्हणाले.भाजप-शिनसेनेचा प्रत्येक मंत्री काम करतो. आमचे सर्व मंत्री व्यवस्थित काम करतात. तेच तुम्हाला न्याय देतील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढं नेतोय. हैदराबादला गेलो होतो. तेव्हा लोकं आमच्यासोबत होते. आम्ही 50 लोकांनी उचलेलं पाऊल हे दखलपात्र घटना होती.

बाळासाहेबांचे विचार पुढं न्यायचे आहेत. म्हणून आम्ही धाडसानं हे पाऊल उचललं. बाळासाहेबांची इच्छा होती की, कश्मिरमधील 370 कलम हटवा. ही बाळासाहेबांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमित शहा यांनी पूर्ण केली.

राममंदिर बांधण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. राममंदिर बांधण्याचं काम सुरू आहे. मग आम्ही भाजपसोबत गेलोत. तर काय झालं, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.

असंघाशी संघ केला तेव्हा काही वाटलं नाही का, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.