NCP Ministers Meet Sharad pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे? जयंत पाटील म्हणाले कागदावरच आमचाच पक्ष मोठा, पण…

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादीत फूट पडल्याने विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले आहे. यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने आपला दावा सांगितला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केलंय.

NCP Ministers Meet Sharad pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे? जयंत पाटील म्हणाले कागदावरच आमचाच पक्ष मोठा, पण...
JAYANT PATILImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 5:54 PM

मुंबई | 16 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज अचानक वेगवान घडामोडी घडल्या. अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही अनपेक्षित अशी घटना असल्याचे सांगितले आहे. तर, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. त्यामुळे हे पद कुणाकडे जाणार यावरही मोठे भाष्य केले आहे.

अजित पवार यांच्या गटाने काही भूमिका घेतली असली तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. ते सत्तेत सहभागी झाले मात्र आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत. तसे पत्र आम्ही विधासभा अध्यक्ष यांना दिले आहे. आमची बैठक व्यवस्था स्वतंत्र व्हावी अशी आम्ही मागणी केली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे असे जयंत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण व्हावा याबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. आमच्यासोबत 19 ते 20 आमदार आहेत. काही आमदारांनी आम्हाला फोन केला. तर, आम्ही स्वतःहून काही आमदारांना संपर्क केला. त्यांची मनापासून शरद पवार यांच्यासोबत रहाण्याची इच्छा आहे. त्यामुळे सभागृहात ही संख्या निश्चित होईल असेही त्यांनी सांगितले.

जे काही जण तिकडे गेले तरी ते राष्ट्रवादीचेच आहेत असे म्हणत आहेत. पण, आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे आता तरी कागदावर आमचाच पक्ष मोठा आहे. मात्र, आमची संख्या ही काँग्रेसपेक्षा कमी असेल तर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे देऊ.

आमच्याकडे जरी विरोधी पक्षनेते पद दिले तरी विरोधी पक्षाचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे यासंदर्भांत आम्ही अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करू असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.