महाराष्ट्र विधानसभा बहुमत चाचणी : हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण?

बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही. त्याचं लाईव्ह चित्रीकरण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा बहुमत चाचणी : हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण?
Follow us
| Updated on: Nov 26, 2019 | 11:09 AM

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test) लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. आता हंगामी अध्यक्षपदाबाबत उत्सुकता आहे (Protem Speaker Floor Test) .

ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही. त्याचं लाईव्ह चित्रीकरण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) दिले आहेत. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करण्यासही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु, उद्या अग्निपरीक्षा!

हंगामी अध्यक्षपदासाठी 17 विधानसभा सदस्यांची नावं सचिवालयाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सर्वाधिक वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, के सी पाडवी, कालिदास कोळमकर, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गोवर्धन शर्मा, हितेंद्र ठाकूर, प्रकाश भारसाखळे, मंगलप्रभात लोढा, बबनराव शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.

पक्षनिहाय भाजप (10) – हरिभाऊ बागडे, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळमकर, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाखळे, मंगलप्रभात लोढा

राष्ट्रवादी (04) – दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, बबनराव शिंदे

काँग्रेस (02) – बाळासाहेब थोरात, के सी पाडवी

बविआ (01) – हितेंद्र ठाकूर

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबतचा महानिकाल आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) दिला. सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर, तात्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) केली होती त्याबाबत रविवार आणि सोमवार अशा दोन्ही दिवस दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला.

शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली. (Protem Speaker Floor Test)

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.