Kerala Assembly Elections 2021 : यंदाही केरळात डावे गड राखणार का?

| Updated on: Mar 25, 2021 | 4:54 PM

केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. Kerala Assembly Elections 2021

Kerala Assembly Elections 2021 : यंदाही केरळात डावे गड राखणार का?
kerala Assembly election
Follow us on

तिरुवनंतपुरम : निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होत आहेत. त्यापैकी केरळमध्ये (Kerala Assembly Elections 2021 )सध्या कुणाची सत्ता आहे? तिथलं पक्षीय बलाबल काय आहे? 2016 साली तिथे काय स्थिती होती?… याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया… (whole scenario of kerala politics for 2021 assembly election)

केरळमध्ये एका टप्प्यात मतदान

केरळमध्ये 140 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. केरळात 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

2016 च्या निवडणुकीत काय चित्र होतं?

केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 71 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2016 च्या निवडणुकीत एलडीएफने 83 जागांवर विजय मिळवला होता तर यूडीएफने 47 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे भाजपची मात्र पुरती धुळधाण झाली होती. 98 जागांपैकी फक्त एका जागेवर भाजपचा विजय झाला होता.

केरळचे सध्याचे मुख्यमंत्री कोण?

केरळच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पिनराई विजयन यांनी यशस्वीरित्या सांभाळला. केरळात सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखाली लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचं म्हणजेच (एलडीएफ) चं सरकार आहे.

केरळमध्ये कोण कोणते प्रमुख पक्ष

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार केरळात 39 पक्ष निवडणूक लढवत आहेत. यामध्ये बसपा, भाजप, सीपीआय, सीपीआय (एम), इंडियन नॅशनल काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष तसंच प्रादेशिक पक्षाबाबत बोलायचं झाल्यास इंडियन युनियन मुस्लिम लिग, जनता दल, जनता दल सेक्युलर, केरळ काँग्रेस हे पक्ष आहेत.

केरळमधील पक्षीय बलाबल (2016)

CPI (M) -58
काँग्रेस -22
CPI – 19
IML – 18
IND-06
BJP-01
इतर – 16
एकूण जागा- 140

संबंधित बातम्या:

पाच राज्यांत आजपासून प्रचाराचं ‘तांडव’; पश्चिम बंगाल, आसाममध्ये 27 मार्चला, तर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान, 2 मे रोजी निकाल!

Assam Assembly Election 2021 date : आसाम विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदान आणि निकाल कधी?

‘मिशन बंगाल’: ‘वाघीण’ सरस ठरणार की ‘कमळ’ फुलणार; वाचा पश्चिम बंगालचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट!

रण तामिळनाडूचे! बिगूल वाजला; पण सत्ता कुणाला मिळणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Puducherry Election 2021 | पुद्दुचेरीत काय होणार? काँग्रेस पुन्हा येणार की जाणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट!