Congress : मतदानाच्या दिवशी 11 काँग्रेस आमदार अनुपस्थित का?, काँग्रेस नेते मोहन प्रकाश दिल्लीत अहवाल सादर करणार

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. नियोजनाअभावी हांडोरे यांना पराभव पत्करावा लागला. हे असं का झालं, याची चौकशी मोहन प्रकाश नेत्यांशी बोलून करणार आहेत. त्यानंतर अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठींना तो दिला जाईल.

Congress : मतदानाच्या दिवशी 11 काँग्रेस आमदार अनुपस्थित का?, काँग्रेस नेते मोहन प्रकाश दिल्लीत अहवाल सादर करणार
मोहन प्रकाश व राहुल गांधी
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 9:34 PM

नवी दिल्ली : विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) काँग्रेसची भूमिका संशयास्पद राहिली. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजपनं विश्वास दर्शक ठरावं संमत केला. त्यावेळी काँग्रेचे 11 आमदार (MLA) ठरावाच्या वेळी उपस्थित राहू शकले नव्हते. या आमदारांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांना राज्यात पाठविले. मोहन प्रकाश हे राज्याचे प्रभारी आहेत. त्यांच्यावर या प्रकरणाची चौकशी ( Inquiry) करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मोहन प्रकाश करणार नेत्यांशी चर्चा करतील. 11 आमदारांच्या मतदानाच्या दिवशी गैरहजर का होते. यासह राज्यातील काँग्रेसच्या सद्यस्थितीचा देणार आढावा घेणार आहेत. त्याचा अहवाल तयार करून नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना दिला जाणार आहे.

चंद्रकांत हांडोरेंचा पराभव का झाला?

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. नियोजनाअभावी हांडोरे यांना पराभव पत्करावा लागला. हे असं का झालं, याची चौकशी मोहन प्रकाश नेत्यांशी बोलून करणार आहेत. त्यानंतर अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठींना तो दिला जाईल. याचा अर्थ काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल आहे, असं नाही. शिवसेनेत उघड बंडाळी झाली. काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दिसून येतात. नेमकं प्रकरण काय आहे, याची चौकशी यानिमित्तानं होणार आहे.

भाई जगतापांनी केली मागणी

विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार अनुपस्थित होते. यामुळं काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले. त्यामुळं या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोहन प्रकाश यांनी राज्याचे प्रभारी म्हणून काम केलंय. त्यांचा महाराष्ट्रातील राजकीय पार्श्वभूमी माहीत आहे. त्यामुळं या चौकशीची जबाबदारी त्यांच्याकडं सोपविण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींना माहिती दिली. तसेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी क्रॉस वोटिंग करणारे आणि विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केलीय.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.