Video Ajit Pawar : बांबूच्या टोपलीवाल्याचा मुलगा मंत्री का बनू शकत नाही, अजित पवार यांची किशोर जोरगेवारांवर टिपण्णी
देशात चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, असं वक्तव्य यावेळी पवार यांनी केलंय. रिक्षेवाला मुख्यमंत्री होऊ शकतो. मग, टोपल्या वाल्यांचा मुलगा मंत्री का होऊ शकत नाही. असं अजित पवार यांनी जोरगेवार यांच्याशी बोलताना म्हटलं आहे.
चंद्रपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानिमित्त त्यांनी चंद्रपुरात अपक्ष आमदाराच्या घरी भेट दिली. यामुळं चर्चांना उधाण आलंय. विरोधी पक्ष नेते अजित पवार अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी दाखल झाले. आमदार जोरगेवार यांच्या घरी पवार यांचे स्वागत करण्यात आले. आमदार जोरगेवार यांनी आईच्या नावाने सुरू केलेल्या अम्मा टिफिन (Amma Tiffin) या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या उपक्रमाची पाहणी केली. जोरगेवार कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान चहावाला पंतप्रधान (Prime Minister)- रिक्षेवाला मुख्यमंत्री (Chief Minister) तर बांबूच्या टोपलीवाल्याचा मुलगा मंत्री का बनू शकत नाही, अशी हास्यकल्लोळात प्रतिक्रिया दिली.
पाहा व्हिडीओ
पवारांची मिश्किल्ल टिपण्णी काय
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली आहे. चंद्रपूरमध्ये जोरगेवार यांच्या घरी जाऊन अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली. सध्या जोरगेवार यांचं शिंदे गटाला समर्थन आहे. देशात चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, असं वक्तव्य यावेळी पवार यांनी केलंय. रिक्षेवाला मुख्यमंत्री होऊ शकतो. मग, टोपल्या वाल्यांचा मुलगा मंत्री का होऊ शकत नाही. असं अजित पवार यांनी जोरगेवार यांच्याशी बोलताना म्हटलं आहे. मिश्कीलपणे ही टीपण्णी त्यांनी केली आहे.
किशोर जोरगेवार यांचे शिंदे गटाला समर्थन
विरोधी पक्ष नेते अजित पवार शहरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी गेले. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना जोरगेवार यांनी आघाडीला समर्थन दिले होते. मात्र, सध्या आमदार जोरगेवार यांनी बंडखोर शिवसेना गटाला समर्थन दिले आहे. अजित पवार यांची अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी होणारी भेट महत्त्वाचे असल्याची चर्चा आहे. खरं, तर अजित पवार हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आलेत. यानिमित्त त्यांनी राजकीय भेटीही घेतल्या. मंत्रिमंडळ विस्तारावर केलेली टिपण्णी लक्षणीय ठरली. कारण आता वेध लागले आहेत, ते मंत्रिमंडळ विस्ताराचे. कोण मंत्री होणार, याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय.