Ram mandir Ayodhya | अयोध्येत रामललाच्या प्राण प्रतिष्ठेची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतस राजकारणही तापू लागलं आहे. 22 जानेवारील होणाऱ्या सोहळ्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला निमंत्रण मिळालय. पण काँग्रेसने येण्यास नकार दिलाय. हा RSS आणि भाजपाचा कार्यक्रम असून राम मंदिर राजकीय मुद्दा बनला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हे सर्व केलं जातय असं काँग्रेसच म्हणणं आहे. भाजपा राम मंदिर मुद्यावर राजकारण करत आणि सत्ता मिळवण्यासाठी या मुद्याचा वापर होतो, असा काँग्रेसचा आरोप आहे. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने राम मंदिरावर अंतिम निकाल दिला. या मुद्यावर राजकारण करुन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा सारख्या पक्षांसाठी कायमस्वरुपी दरवाजे बंद झालेत, असं त्यावेळी काँग्रेसने कोर्टाच्या निर्णयावर म्हटलं होतं.
आता हे पक्ष राम मंदिर मुद्यावर राजकारण करु शकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांसाठी सम्मानाच प्रतीक आहे. सर्व समाजांनी परस्परांची श्रद्धा आणि विश्वास याचा सन्मान केला पाहिजे असं काँग्रेसने त्यावेळी म्हटलं होतं. काँग्रेसचे काही नेते निमंत्रणाचा स्वीकार करावा या मताचे आहेत. उत्तर प्रदेशातून आचार्य प्रमोद आणि गुजरातमधून अर्जुन मोढवाडिया यांनी काँग्रेसचा निर्णय चुकीचा असल्याच म्हटलं आहे. हिमाचल प्रदेशचे विक्रमादित्य सिंह यांनी 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला जाणार असल्याच सांगितलं.
भाजपाला आयता मुद्दा दिला?
निमंत्रण नाकारल्यामुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाताला आयता मुद्दा लागला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ते हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरू शकतात. काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची संधी सोडणार नाहीत.
राहुल गांधी अयोध्येत जाऊन राम मंदिरात गेले नाहीत का?
काँग्रेसने नेहमीच राम मंदिराच्या मुद्यावर सावध भूमिका घेतली आहे. कुठल्या एका धर्माचा पक्ष हा संदेश जाऊ नये, हा काँग्रेसचा प्रयत्न असतो. त्याचमुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी कधी राम मंदिरात गेले नाहीत. 1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर 2016 मध्ये अयोध्येला जाणारे राहुल गांधी पहिले सदस्य होते. पण ते फक्त हनुमानगढी मंदिरात दर्शनासाठी गेले. राम मंदिरात गेले नाहीत. त्यांची बहिण 2019 साली पहिल्यांदा अयोध्येला गेली. त्या सुद्धा राम मंदिरात गेल्या नव्हत्या.