Nitin Gadkari | ‘फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे’, असं नितीन गडकरी का म्हणाले?

कृषी प्रदर्शनासाठी मोफत बस मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ती काही मान्य करण्यात आली नव्हती. असं नेमकं का करण्यात आलं, त्याचं उत्तर नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात बोलताना दिलं आहे.

Nitin Gadkari | 'फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे', असं नितीन गडकरी का म्हणाले?
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 7:37 PM

नागपूर : नागपुरात (Nagpur) नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) एका कार्यक्रमात महत्त्वाचं विधान केलं आहे. फुकट दिलं, तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. ऍग्रोव्हिजन (Agro-Vision) कृषी प्रदर्शनाच्या (Exhibition) कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. फुकटचं कुणालाच काही द्यायचं नाही, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

फुकट का नको?

नागपुरात नितीन गडकरींच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप आज करण्यात आला. या समारोप कार्यक्रमाला नितीन गडकरींती प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नितीन गडकरींनी संबोधित करताना कृषी प्रदर्शनाच्या आयोजकांना उद्देशूनच महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की…

फुकटंच कुणाला काहीच द्यायचं नाही, नाही तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे. त्यामुळेच कृषी प्रदर्शनात यायला मोफत बसेस दिल्या नाही.

कृषी प्रदर्शनासाठी मोफत बस मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ती काही मान्य करण्यात आली नव्हती. असं नेमकं का करण्यात आलं, त्याचं उत्तर नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात बोलताना दिलं आहे. कृपी प्रदर्शनासाठी यायला लोकांना सोयीचं जावं, यासाठी मोफत बस सेवा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र तसं केलं तर लोकांना या कृषी प्रदर्शनाची किंमत उरणार नाही, असं म्हणत नितीन गडकरींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नागपुरात लवकरच ऍग्रो कन्वेशन सेंटर

24 डिसेंबरपासून नागपुरात ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचा आज अखेर समारोप करण्यात आला. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती आणि आधुनिक शेतीबाबतही अनेक गोष्टी माहीत झाल्या असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो आहे. त्यासोबत शेतीतील नवनव्या तंत्रज्ञानाबाबतही या प्रदर्शनातून प्रबोधन करण्यात आलं होतं. यासोबत नागपुरात तेलंखडी गार्डन परिसरात ऍग्रो कन्वेशन सेंटर तयार करणार असल्याची माहितीही यावेळी नितीन गडकरी यांनी दिली आहे. दरम्यान समारोपावेळी शेतकऱ्यांनी उद्देशून नितीन गडकरींनी म्हटलंय की,…

वीज निर्निती प्रकल्पात बांबूचा वापर झाल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. फ्लेक्स इंजिनचं आजच ॲार्डर निघाली. पेट्रोल इंजिन बनवणाऱ्या कंपन्यांची दिल्लीत लवकरच बैठक घेऊन त्यांना तीन चार महिन्यात फ्लेक्स इंजिन तयार करण्यास सांगणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनीच इथेनॅालचे पंप चालवावेत. गावातील तरुणाला रोजगार मिळाला तर गावाची आर्थिक स्थिती सुधारेल.

इतर बातम्या –

Mumbai Corona Update | मुंबईत दिवसभरात 809 नव्या कोरोना रुग्णांची नोद, 3 जणांचा मृत्यू, संकट वाढले ?

VIDEO : Bhaskar Jadhav | ए… उठा रे ! विधान भवनात भास्कर जाधव का भडकले?

Android TV घ्यायचाय? 16 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतले ‘हे’ पर्याय आवर्जून पाहा

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.