उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो’ चा निर्णय का घेतला ? पाच मुद्द्यात जाणा

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या विधानसभेतील मोठ्या पराभवाने एकीकडे त्यांच्या पक्षाला मोठी गळती लागले आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे जागा वाटपावरुन काँग्रेस पार्टीशी वाजल्याने उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काय आहे यामागे कारण ?

उद्धव ठाकरे यांनी 'एकला चलो' चा निर्णय का घेतला ? पाच मुद्द्यात जाणा
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 3:46 PM

एकीकडे दिल्ली विधानसभांचा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची बातमी असताना आता शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूकांत शिवसेना उद्धव ठाकरे गट एकटाच निवडणूका लढविणार असल्याचे संकेत नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत हा पहिलाच प्रसंग असेल ज्यात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेत स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे.साल २०१९ मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवली होती.

उद्धव ठाकरे यांचा पक्षा महाविकास आघाडीतील मोठा पक्ष आहे. त्याची टक्कर मुंबई महानगर पालिका निवडणूकीत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीशी होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला की या महायुतीशी लढण्यासाठी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा आधार न घेता ‘एकला चलो रे’ का म्हणत आहेत ?

पालिका निवडणूकीत उद्धव ठाकरे एकटे लढण्याची पाच कारणे …

हे सुद्धा वाचा

१ – पवार यांचे चित्र स्पष्ट नाही

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या मुळेच काँग्रेसच्या आघाडी सोबत आले आहेत. साल २०२४ च्या विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर पवार काय नि्र्णय घेतील त्याबाबत संदिग्धता आहे. राजकारणात पवार यांच्याबाबत दोन चर्चा सुरु आहेत. पहिली चर्चा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात. दुसरी ही चर्चा आहे की सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना सोडून इतर नेते अजितदादा यांच्या गटात जाऊ शकतात. शरद पवार यांच्या सोबत आठ खासदार आणि १० आमदार आहेत. शरद पवार यांच्याकडे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हेच ज्येष्ठ नेते उरले आहेत.

जर शेवटच्या क्षणी पवार यांच्या पक्षात काही गडबड झाली तर याचे थेट नुकसान शिवसेनेच्या ( युबीटी ) परफॉर्मेंसवरही होणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी शिवसेना युबीटीकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था राहणार नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरे आपले स्वतंत्र पिच तयार करण्याच्या तयारीला लागले आहेत.

 २ – काँग्रेसचे जलद प्रतिसाद न देणे

विधानसभा निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी ३० हून अधिक जागांवरुन तिडा सुटत नव्हता. या जागाचा तिडा न सुटण्यामागे ठाकरे गट आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद न संपल्याचे म्हटले जात होते. त्याचा थेट तोटा दोन्ही पक्षांच्या विधानसभेतील कामगिरीवर झाला. आणि काँग्रेसचा खेळ हा १६ जागांवर आटोपला.

पराभवानंतर शिवसेना उद्धव गटात अंबादास आणि संजय राऊत हे काँग्रेसवर निर्णय न घेण्यासंदर्भात प्रश्न करीत आहे. एवढेच नाही तर पराभवानंतर काँग्रेस महाराष्ट्रात मोठी सर्जरी करण्याची तयारी केली होती. परंतू त्याची अमलबजावणी झालेली नाही.

काँग्रेस पक्षातील ही साफसफाई कधी होणार आणि नव्याने उमदीने पक्ष पुन्हा मैदानात केव्हा उतरणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांचा काही जास्त लाभ झालेला नाही. लोकसभा निवडणूकीत जास्त जागांवर लढण्यानंतरही उद्धव यांचा पक्ष काँग्रेसपेक्षा कमी जागांवर जिंकला आहे.

मुंबई महानगर पालिकेवर साल १९९५ पासून शिवसेनेचा कब्जा आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांचा मोठा जनाधार अजूनही शिल्लक आहे. गेल्यावेळी ठाकरे यांनी ८४ जागांवर विजय मिळाला होता. नगरसेवकांची संख्या २३६ इतकी आहे. येथे महापौर बनण्यासाठी ११९ जागांवर जिंकणे महत्वाचे असते.

३- बीएमसी निवडणूकात मोठे दावेदारी

उद्धव ठाकरे सर्व जागांवर जिंकून स्थानिक पातळीवर आपली संघटना मजबूत करण्याच्या तयारीला लागले आहेत. जर आघाडी गेले तर जागांची वाटणी करावी लागली असती. त्यापासून वाचण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व जागांवर एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटप झाल्या असत्या तर ठाकरे यांच्या गटातील अनेक मजबूत दावेदार एकनाथ शिंदे यांच्या किंवा भाजपाच्या कळपात गेले असते.

४ – हिंदुत्वाच्या मुद्द्यांला धार देण्याची तयारी

शिवसेना सुरुवातीपासून मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करीत आली आहे. मुंबई आणि आजबाजूच्या परिसरावर त्यांचा प्रभाव पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा मुंबई आणि कोकणात मोठी जनाधार आहे.महाविकास आघाडीत राहिल्यास हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर उघड भूमिका घेता येत नव्हते.

अलिकडेच बाबरी विद्धंस बाबत ठाकरे यांच्या निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन काँग्रेसच्या अल्पसंख्यांक समुदायाने नाराजी जाहीर केली होती. काँग्रेसपासून वेगळी वाट करुन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या मुद्याला धार देण्याच्या तयारीत आहेत.

५ -भविष्यात निर्णय घेणे सोपे होणार

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यात राजकारणात केव्हा काय होऊ शकते हे कोणी सांगू शकत नाही. ठाकरे यांची शिवसेना स्वतंत्र लढून भविष्यातील आपले राजकारण साध्य करु इच्छीत असेल. एकट्याने जर लढून शिवसेनाचा परफॉर्मेंन्स जर चांगला झाला तर बीएमसी वाचविण्यासाठी नव्याने पुन्हा ठाकरे यांची शिवसेना कोणत्याही पक्षा सोबत आघाडी किंवा युती करु शकते.

उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरु आहे. अलिकडे दोनदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांची भेट झालेली आहे.

आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.