सर्वपक्षीय बैठकीला का गेले नाही?; शरद पवार यांचा खुलासा काय?

विधान परिषद निवडणूकीत पुन्हा दोन वर्षांपूर्वी सारखाचा राजकीय ड्रामा झाल्याने शरद पवार बॅकफूट पडले आहेत. आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींवरील पडदा दूर केला आहे.

सर्वपक्षीय बैठकीला का गेले नाही?; शरद पवार यांचा खुलासा काय?
शरद पवारImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 1:25 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधान परिषद निवडणूकांनंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते काय म्हणणात यावर साऱ्या पत्रकार सृष्टीचे लक्ष लागले होते. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंवा दिलेला उमेदवार शेकापचे जयंत पाटील पडले आहेत. याविषयावर आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ओबीसी आणि मराठामध्ये झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षांनी दांडी मारली होती. या बैठकीला आयत्यावेळी शरद पवार यांचा फोन आल्याने विरोधी पक्ष आला नाही असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.आणि स्वत:छगन भुजबळ दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेल्याने चर्चेला ऊत आला आहे. यावर देखील शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

शरद पवार यांनी पुढे म्हणाले की भुजबळांची दोन्ही भाषणं छान झाली. त्याआधी ते बीडला गेले. बारामतीतही चांगले भाषण केलं.दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं.त्यानंतर ते मला भेटायला आले. मला ताप होता. मी दोन दिवस सुट्टी काढली.मला सांगितलं भुजबळ साहेब आले.मला सांगितलं ते एक तासापासून आले आहेत.जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर ते आले मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या.या गोष्टी केल्या तर राज्याचं हित आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील वातावरण दुरुस्त करायचं असेल तर मी आलं पाहिजे वगैरे ते आपल्याला म्हणाल्याचेही पवार यांनी सांगितले.शरद पवार यांनी पुढे सांगितले की मी बैठकीला गेलो नाही.याल दोन कारणे होती.मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांचे सहकारी जरांगेचं उपोषण सुरू होतं त्यावेळी घटनास्थळी गेले आणि त्यांना भेटले. त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही? त्यानंतर उपोषण सुटलं. त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला. याचा अर्थ काही तरी त्यांच्यात संवाद होता. तो आम्हाला माहीत नव्हता असे शरद पवार यांनी सांगितले.

तोपर्यंत  चर्चा करण्यात अर्थ काय ?

शरद पवार पुढे म्हणाले की दुसरीकडे ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू होतं.तिथे राज्य सरकारचे मंत्री गेले.त्यांचं काय बोलणं झालं माहीत नव्हतं.त्यांच्यातील सुसंवाद माहीत नव्हता. त्यामुळे मिटिंगलान जाण्याचं कारण एकच होतं की, सरकार जरांगे आणि ओबीसीं नेत्यांशी बोलत आहेत. त्यानंतर नेते काही विधानं करत आहेत. पण संवाद काय झाला आणि प्रस्ताव काय होता ? हे पब्लिकला आणि आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे जरांगे यांना सरकारने काय आश्वासन दिलं याचं वास्तव चित्र आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जी कमिटमेंट केली, त्याची माहिती येत नाही.. तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांनी आम्हाला माहिती दिली तरच आम्ही जाऊ शकतो असं ठरवलं. त्यांनी ४०-५० लोकांना बोलावलं आणि चर्चा केली. तिथे आपलं मत मांडावं असं योग्य वाटलं नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.

शहाणपणाची भूमिका नव्हती

विरोधकांनी मत मांडावं असा त्यांचा आग्रह आहे. राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका संमजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती असेही शरद पवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.