तुम्ही सत्तेत असताना मदरशांचं अनुदान बंद का केलं नाही?; मलिक यांचा भाजपला सवाल
सुडबुद्धीने, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी आणि जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपचे लोक मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबई : सुडबुद्धीने, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी आणि जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपचे लोक मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. वर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना तुम्हाला का सुचली नाही? याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. (Why didn’t you stop subsidizing madrassas when you were in power? Nawab Malik’s question to BJP)
मदरशांमधील विद्यार्थ्यांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रतिमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. ही योजना बर्याच काळापासून राज्यात सुरू आहे. भाजपचे सरकार असतानाही योजना सुरुच होती आणि आता भाजपचे लोक अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत. हे कितपत योग्य आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
राजकीय दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी होत आहे. राज्यातील भाजप सरकारकच्या काळात हज का बंद केले नाही याचं आत्मचिंतन त्यांनी करावं आणि मग अशा प्रकारची मागणी करावी, असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
संबंधित बातम्या
राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या एमआयएमच्या तौफिक शेख यांचं नगरसेवक पद रद्द
सुडापोटी फडणवीसांच्या चौकशीचा घाट, शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा; आठवलेंची मागणी
एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य
“ठाकरे नावावरुन विश्वास उडेल…” नांदगावकरांच्या ट्विटला शिवसेनेच्या ‘दादा’ नेत्याचे उत्तर
मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवर मनसेचे पहिल्यांदाच भाष्य
एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू ‘या’ नेत्याकडे टोलवला
(Why didn’t you stop subsidizing madrassas when you were in power? Nawab Malik’s question to BJP)