व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही, उदयनराजेंचं भुजबळांना उत्तर

माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही, असं उदयनराजे म्हणाले.

व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही, उदयनराजेंचं भुजबळांना उत्तर
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 1:32 PM

सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle on Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उत्तर दिलं आहे. “भुजबळ हे वयाने मोठे आहेत. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही”, असा टोमणा उदयनराजे भोसले यांनी लगावला. (Udayanraje Bhonsle on Chhagan Bhujbal) उदयनराजे भोसले यांचा आरक्षणाचा (Reservation) अभ्यास कमी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर उदयनराजेंनी भाष्य केलं.

उदयनराजे म्हणाले, “छगन भुजबळ हे वयाने मोठे आहेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे मी मान्य करतो. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही. इतरांबरोबर मराठा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे यात अभ्यास काय करायच?”

व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन

“व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही. त्यांचा फार मोठा अभ्यास. कॉमन सेन्स त्यांचा काय कुणाचाच, मला त्यांच्यावर आरोप करायचा नाही. पहिल्यापासून आरोप प्रत्यारोप होत आहेत. मला त्यात जायचं नाही. मला एव्हढंच सांगायचं आहे, बाकीच्या समाजाचं जसं आरक्षण आहे, तसं मराठा समाजालाही न्याय मिळायला हवा, त्यात अभ्यासाचं काय?” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उदयनराजेंचा अभ्यास कमी आहे, असं भाष्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण मिळायलाच हवं अशी भूमिका घेतलीत आहे. मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं उदयनराजे म्हणाले होते. आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला होता.

सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

संबंधित बातम्या 

मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.