मनोहर जोशी, गजानन किर्तीकर आणि लीलाधर डाके; शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट का घेतली? अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले उत्तर

मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांच्या सोबत काम केले. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर चर्चा करून 60 योजना बनवल्या होत्या. या 60 योजनांची त्यांनी घोषणा केली होती. हे पुस्तक देखील मनोहर जोशी यांनी मला भेट दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या योजनांची त्यांनी युती सरकारच्या काळामध्ये घोषणा केली होती त्या योजना पुन्हा राबवणार. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा प्रकारची भावना जेशी यांनी व्यक्त केली. आमचे युतीचे सरकार देवेंद्रजींनी आम्ही दोघं मिळून या योजना नक्की पूर्ण करू आणि पुढे नेऊ असे शिंदे यांनी सांगीतले.

मनोहर जोशी, गजानन किर्तीकर आणि लीलाधर डाके; शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट का घेतली? अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले उत्तर
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 7:52 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच दिवशी घेतली शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे. सर्व प्रथम खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Senior Leaders Leeladhar Dake), यांची भेट घेतली. यानंतर ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना भेटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच दिवशी घेतली शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटाला पाठिंबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दिग्गज नेत्यांची भेट घेत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषद देत या भेटी मागचे कारण दिले आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा यासाठी ही सदिच्छा भेट असून राजकीय अर्थ आपण काढू नये असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी घेतली भेट

बाळासाहेबांच्या बरोबर काम केलं शिवसेना वाढवण्याचे काम केलं आणि त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या बरोबरचे प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये मनोहर जोशी सर प्रमुख होते आणि अशा ज्येष्ठ नेत्यांची आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा त्यांचा मार्गदर्शन नेहमीच कामी येणार आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले जेष्ठ नेते आहेत त्यांचे आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा यासाठी ही भेट आहे. याचा कुठलाही अर्थ राजकीय अर्थ आपण काढू नका असे शिंदे पत्रकारांना म्हणाले.

बाळासाहेंबाच्या स्वप्नातील 60 योजना पूर्ण करणार – शिंदे सरकारमध्ये 60 योजना जाहीर

मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांच्या सोबत काम केले. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर चर्चा करून 60 योजना बनवल्या होत्या. या 60 योजनांची त्यांनी घोषणा केली होती. हे पुस्तक देखील मनोहर जोशी यांनी मला भेट दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या योजनांची त्यांनी युती सरकारच्या काळामध्ये घोषणा केली होती त्या योजना पुन्हा राबवणार. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा प्रकारची भावना जेशी यांनी व्यक्त केली. आमचे युतीचे सरकार देवेंद्रजींनी आम्ही दोघं मिळून या योजना नक्की पूर्ण करू आणि पुढे नेऊ असे शिंदे यांनी सांगीतले.

एकनाथ शिंदेचा भेटीचा सिलसिला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करत मोठा राजकीय भूकंप केला. त्यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार व्हावे लागले. राज्यात शिंदे-फडणवीस असं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. शिवसेना आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करत आहेत. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदारांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांनी सध्या भेटीगाठीचा सपाटा लावला आहे. अनेक वर्षे शिवसेनेत सक्रिय असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी शिंदे घेत आहेत. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहेत. तर बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून लीलाधर डाके हे शिवसेनेसोबत आहेत. तर मनोहर जोशी हे दखील शिवसेनेतील एक मोठ नाव आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.