Andheri By Election : ऋतुजा लटके यांनी 2 राजीनामे का दिले? शिंदेंनी शोधून काढला ठाकरे गटाला अडचणीत आणणारा मुद्दा
ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा मंजूर झालेला नाही. त्यातच भाजपने ठाकरे गटाला अडचणीत आणणारा मुद्दा शोधून काढला आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीसाठी महाविकासआघाडीतर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारा देण्यात आली आहे. BMC जॉबमुळे ऋतुजा लटके यांचा उमेद्वारी अर्जच धोक्यात आला आहे. त्यांचा नोकरीचा राजीनामा मंजूर झालेला नाही. त्यातच भाजपने ठाकरे गटाला अडचणीत आणणारा मुद्दा शोधून काढला आहे.
ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असून महिनाभरापूर्वीच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. तांत्रिक अडचणींचे कारण देत मुंबई महापालिका प्रशासनाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे.
नोकरीचा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत त्या विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरू शकत नाहीत. अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे.
यावरुनच भाजपने ठाकरे गटाला अडचणीत आणणारा मुद्दा मांडला आहे. ऋतुजा लटके यांनी 2 राजीनामे का दिले? असा सवाल भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदें यांनी उपस्थित केला आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजुर न व्हावा यासाठी भाजपकडून दबाल आणला जात असल्याचा आरोप केला जात आहे. भाजपवर या सर्व प्रकरणाचं खापर फोडणं चुकीच असल्याचं प्रभाकर शिंदे यांचे म्हणणे आहे.
नियमानुसार नोकरी सोडण्याआधी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. 2 सप्टेंबरला लटके यांनी जे राजीनामा पत्र दिलं त्यात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी लागली तर असं म्हणत राजीनामा देत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला नव्हता.
यानंतर त्यांनी 3 ऑक्टोबरला राजीनामा पत्र दिले. तारखेनुसार एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही. यामुळे नियमानुसार त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही असे दोन मुद्दे प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केले आहेत.
गोंधळ निर्माण करुन ऐन वेळी दुसराच उमेदवार देण्याचा ठाकरे गटाचा प्लान आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यासह बनवाबनवी सुरु असल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. महाविकास आघाडीतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.