मागासवर्गीय अहवालाचे संपूर्ण भाषांतर इंग्रजीत का केलं नाही? संभाजी राजे छत्रपती यांचा सरकारला सवाल
मागासवर्गीय अहवालाचे संपूर्ण भाषांतर सरकारने इंग्रजीत का केलं नाही?, असा सवाल खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी विचारला आहे. | Sambhajiraje
नवी मुंबई : मागासवर्गीय अहवालाचे संपूर्ण भाषांतर सरकारने इंग्रजीत का केलं नाही?, असा सवाल खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी विचारला आहे. वाशी येथे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजी राजे उपस्थित होते. (Why was the backward class report not translated into English Question Sambhajiraje)
राज्य सरकार कडून मागास आयोगाचा संपूर्ण अहवाल वरिष्ठ वकिलांना अभ्यासासाठी भाषांतरीत करून दिला नसल्याचा आरोप संभाजी राजे यांनी केला. मागासवर्गीय आयोग भाषांतरीत केला असता तर आभ्यास करणे सोपे गेले असते, असं ते म्हणाले.
आरक्षणाबाबत सरकार हलगर्जीपणा करतंय
मागासवर्गीय अहवालाचे संपूर्ण भाषांतर सरकारने इंग्रजीत भाषांतर न करुन सरकारने त्यांचा हलगर्जीपणा दाखवला आहे, असं म्हणत जर सरकारने अहवालाचं इंग्रजी भाषांतर केलं असतं तर अभ्यास करणं सोपं गेलं असतं, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी, सरकारने एकदिलाने सामोरे जावे
मराठा आरक्षणावर येत्या 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावेळी तरी सरकारने एकदिलाने सामोरे जावे, असे अवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला जाहीर केलेला निधी त्वरीत द्या
मराठा समाजाकडून सरकारच्या मदतीसाठी दोन वरिष्ठ वकील दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान राज्य सरकारने सारथी संस्था आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळासाठी जाहीर केलेला निधी त्वरीत द्यावा, अशी मारणीही संभाजी राजे यांनी केली आहे.
(Why was the backward class report not translated into English Question Sambhajiraje)
हे ही वाचा :
उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी उघडावी, नारायण राणेंचा पलटवार
‘हे शिवसैनिकांचे नाही तर फक्त ‘मातोश्री’चे राज्य’, नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान