रावसाहेब दानवेंची गावरान भाषेत अब्दुल सत्तार आणि खोतकरांवर टीका

जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरांवर अस्सल ग्रामीण भाषेत चौफेर टीका केली. माझ्या मागे लागायचं काय कारण आहे? असं म्हणत त्यांनी अर्जुन खोतकरांवर निशाणा साधला. शिवसेना-भाजप युतीसाठी प्रयत्न करत असले तरी स्थानिक पातळीवर दानवे आणि खोतकर यांच्यात मात्र छत्तीसचा आकडा आहे. “रावसाहेब दानवे राज्याचं […]

रावसाहेब दानवेंची गावरान भाषेत अब्दुल सत्तार आणि खोतकरांवर टीका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरांवर अस्सल ग्रामीण भाषेत चौफेर टीका केली. माझ्या मागे लागायचं काय कारण आहे? असं म्हणत त्यांनी अर्जुन खोतकरांवर निशाणा साधला. शिवसेना-भाजप युतीसाठी प्रयत्न करत असले तरी स्थानिक पातळीवर दानवे आणि खोतकर यांच्यात मात्र छत्तीसचा आकडा आहे.

“रावसाहेब दानवे राज्याचं नेतृत्व करू राहिला, अरे, राज्याचं नेतृत्व मी करतो, तुम्ही करू राहिले ना..”, असं म्हणत दानवेंनी खोतकरांकडे असलेल्या पशुसंवर्धन खात्याची खिल्लीही उडवली. “पशुसंवर्धन मंत्री… एक बकरी नाही आली… देवाची शपथ घेऊन सांगतो.. लेंड्या बी नाय…”, असं म्हणताच दानवेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं भूमीपूजन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आले होते. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दलही दानवेंनी पुन्हा एकदा आश्वासन दिलं. आम्ही दिलेल्या शब्दासाठी कटीबद्ध आहोत. येत्या अधिवनेसनात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जालना जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल तेवढा पैसा मी आणू शकतो, असा विश्वास रावसाहेब दानवेंनी दिला. पण हे सगळं काहींच्या डोळ्यात येतं. असं चाललं तर रावसाहेब दानवे लई मोठा होईल..आवो चोरो बांधे भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा… पहले याला पाडा म्हणतात..काहीही करा याला पाडा, रावसाहेब दानवेंना..तिकून तो सत्तार येऊ राहिला..इकडून तो खोतकर येऊ राहिला..रावसाहेब दानवेंना पाडा म्हणतात, असं म्हणत त्यांनी खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.

तुम्हाला माहीत आहे का, यांची एका एकाची पहली बी पाठ लावली म्या.. अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांनी कधीच माझे काम केलं नाही. त्यांनी आतून बाहेरून बेईमानीच केली, त्यांच्या लक्षात आलं. लपून केलेला खेळ जमत नसल्याने आत्ता उघड एकत्र येऊ राहिले. मी यांचा सगळ्याचा बाप आहे, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी जिल्ह्यातल्या विरोधकांवर टीका केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.