Election : पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? भाजपची आघाडी की विरोधी करतील कुरघोडी.. 

Election : विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप बाजी मारणार की विरोधक कुरघोडी करणार हे लवकरच कळेल..

Election : पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? भाजपची आघाडी की विरोधी करतील कुरघोडी.. 
कोण मारणार बाजीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 7:53 PM

नवी दिल्ली : विधानसभेच्या (Assembly Election) 7 जागांसाठी पोटनिवडणूक (Election) होत आहे. या निवडणुकीत भाजप (BJP) ताकदीने उतरणार आहे.  या सात ही जागांवर विजय मिळविण्याचा चंग बांधूनच भाजप उतरणार आहे. तर विरोधक (Opposition) ही कुरघोडी करण्याच्या बेतात आहेत. आता पारडे कोणाचे जड होते हे पुढच्या महिन्यात स्पष्ट होईल.

पुढील महिन्यात 3 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशामधील विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. एकूण सात जागांसाठी भाजप आणि विरोधी पक्षात थेट सामना रंगणार आहे.यामध्ये कोणाचा वरचष्मा राहील हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

महागाईच्या आघाडीवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला म्हणावं तितके यश आलेले नाही. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्याने चाकरमान्यांचा हप्त्यावरील खर्च वाढला आहे. सर्वच बाजूने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही पोटनिवडणूक अग्निदिव्य असेल. तर विरोधी गटासाठी ही निवडणूक सोपी राहणार नाही.

हे सुद्धा वाचा

सध्या महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. तर बिहार आणि तेलंगणामध्येही परिस्थिती बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीचा फायदा नेमका कोणाला होतो? हे येत्या महिनाभरात स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टीने हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात अंधेरी पूर्वी मतदारसंघात शिंदे गट त्यांचा उमेदवार देणार नाही. तर शिवसेनेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बळ मिळाले आहे. बिहारमध्ये ही महाआघाडीशी भाजपला सामना करावा लागणार आहे. त्यामुळे बदलत्या सत्ता समीकरणात भाजपला विजयश्री खेचून आणायचा आहे.

बिहार मध्ये दोन जागांवर पोट निवडणूक होत आहे. त्यात मोकामा आणि गोपलगंज या जागांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात अंधेरी पूर्व, हरियाणामध्ये आदमपूर, तेलंगणामध्ये मुनुगोडे, ओडिशात धामनगर आणि उत्तर प्रदेशात गोला गोरखनाथ या सात विधानसभेच्या पोटनिवडणुका होतील.

पोटनिवडणुकीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना या ठिकाणी नामनिर्देशनपत्र भरता येऊ शकते. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.