BMC election 2022 Versova Ward 59 : सेनेची वाघीण आपली किमया राखणार की वॉर्डात कमळ फुलणार? काय होणार वॉर्ड 59 मध्ये?

मागील महापालिकेची निवडणूक (2017) मध्ये ही अटीतटी झाली होती. त्यात शिवसेनेच्या प्रतिभा खोपडे यांनी विजय मिळवला होता. तर प्रतिभा खोपडे या यानिवडणूकीत शिवसेनेला तारणार का असाही प्रश्न अनेकांना पडत आहे.

BMC election 2022 Versova Ward 59 : सेनेची वाघीण आपली किमया राखणार की वॉर्डात कमळ फुलणार? काय होणार वॉर्ड 59 मध्ये?
प्रभाग 59 Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 10:09 PM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीची (BMC election) प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून रणकंदन माजल्यानंतर निवडणूका या आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर घेण्यात यावा असा सुर आवळला जात होता. तर ओबीसी आरक्षणावरून भाजपसह विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता ही पहिलीच स्थानिक स्वराज संस्थांची म्हणजेच महापालिकांची निवडणूक होत आहे. तर राज्यातील मुंबईसह 14 महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडतही झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार याकडे लागले आहे. मुंबई महापालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीत महिला, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 127 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणानंतर 236 जागांच्या महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार 110 जागा लढवू शकतात. यावेळी ओबीसींना आरक्षण नाही. राजकीय पक्षांनी स्वतंत्र ओबीसी उमेदवार जाहीर केले आहेत. तर मागील महापालिकेची निवडणूक (2017) मध्ये ही अटीतटी झाली होती. त्यात शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रतिभा खोपडे (Pratibha Khopade) यांनी विजय मिळवला होता. तर प्रतिभा खोपडे या यानिवडणूकीत शिवसेनेला तारणार का की मग भाजप आपले कमळ फुलवणार असाही प्रश्न अनेकांना पडत आहे.

वॉर्ड 59, बेस्ट नगर, गोरेगाव

मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 59 मध्ये बेस्ट नगर, गोरेगाव हा भाग येतो. मात्र नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 59 मध्ये अमृत नगर, सोमानी ग्राम परिसर या प्रमुख ठिकाणांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे निवडणूकीत आपले नशिब आजमावणाऱ्या उमेदवाराला कसरत करावी लागणार आहे. तर प्रभाग क्रमांक 59 च्या माजी नगरसेवक प्रतिभा खोपडे या शिवसेनेला तारणार का असाही प्रश्न अनेकांना पडत आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाप्रतिमा शैलेश खोपडे प्रतिमा शैलेश खोपडे
भाजपडॉ. भानजी प्रिया गजेंद्र
राष्ट्रवादी काँग्रेस-
काँग्रेसकुंभार (पटेल) कोकीळा अशोक
मनसेसुहासिनी प्रवीण कोरगांवकर
अपक्ष / इतर-

सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी राखीव

मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 59 मध्ये बेस्ट नगर, गोरेगाव हा यावेळी सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी राखीव करण्यात आला आहे. त्यामुळे माजी नगरसेवक प्रतिभा खोपडे यांना एका प्रकारे लॉटरी लागली आहे. फक्त ही सर्वसाधारण प्रवर्गातील महिला राखीवची लॉटरी त्यांना कॅश करता येत की नाही हे पहावे लागेल.

हे सुद्धा वाचा

मागील महापालिकेची निवडणूक (2017) मध्ये ही अटीतटी झाली होती. त्यात शिवसेनेच्या प्रतिभा खोपडे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपच्या डॉ. प्रिया भानजी, काँग्रेसच्या उमेदवार कोकीळा कुंभार (पटेल), मनसेच्या सुहासिनी कोरगावकर यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र यावेळची परिस्थिती पुर्ण वेगळी झाली आहे. आधी एकत्र असणारे आज वेगळे झाले आहेत. तर जे वेगळे होते ते आज महाविकास आघाडी सरकारमधून एकत्र झाले आहेत.

शिवसेनेच्या प्रतिभा खोपडे D.Ed.

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत वॉर्ड/प्रभाग क्रमांक 59 मध्ये शिवसेनेकडून प्रतिभा खोपडे मैदानात उतरल्या होत्या. त्या स्वत: उच्चशिक्षित असल्याने प्रश्नांची जाण आणि ते सोडविण्यासाठी त्यांनी प्रत्न केला आहे. प्रतिभा खोपडे यांचे D.Ed.झाल्या आहेत. त्यामुळे मतदारांना एक उच्चशिक्षित उमेदवार मिळाल्याचे समाधान होते.

प्रभागांची संख्या 236 झाली

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले. मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला. तर 118 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी 8 आणि अनुसूचित जमातीसाठी 1 जागा समाविष्ट आहे. अनुसूचित जातीसाठी 7 आणि अनुसूचित जमातीसाठी 1 जागा राखीव घोषित करण्यात आल्या आहेत.

मतदार संघातून सार्वत्रिक निवडणूक 2017

डॉ. भानजी प्रिया गजेंद्र  (भारतीय जनता पार्टी)  6494

प्रतिमा शैलेश खोपडे  (शिवसेना)   7690

सुहासिनी प्रवीण कोरगांवकर  (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)  619

कुंभार (पटेल) कोकीळा अशोक (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस) 5823

एकूण  20666

एकूण मतदार 45905

एकूण वैध मते – 20626

एकूण प्रदत्त मते 01

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.