राहुल गांधी राहणार 2024 मध्ये विरोधी पक्षाचा PM पदाचा चेहरा?, कमलनाथ यांच्या वक्तव्यावर CM नितीशकुमार यांची प्रतिक्रिया

पीएम पदाचा मी दावेदार नसल्याचंही नितीशकुमार यांनी स्पष्ट केलं. तसेच राहुल गांधी यांच्या नावाला माझी सहमती असल्याचंही ते म्हणाले.

राहुल गांधी राहणार 2024 मध्ये विरोधी पक्षाचा PM पदाचा चेहरा?, कमलनाथ यांच्या वक्तव्यावर CM नितीशकुमार यांची प्रतिक्रिया
नितीशकुमार
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 7:19 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण, यावरून चर्चा सुरू आहे. काल यासंदर्भात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी वक्तव्य केलं होतं. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेता राहुल गांधी हे 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. अशावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. नितीशकुमार म्हणाले की, विरोधी पक्षाच्या वतीनं राहुल गांधी यांच्या नावावर आम्हाला आपत्ती नाही. विरोधी पक्षांचे नेते एकमेकांशी चर्चा करतील. पक्षाचे कार्यक्रम करणे प्रत्येकाचे काम आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान पदाचा मी दावेदार नाही. पक्षाच्या कामासोबत आम्हाला काही घेणं-देणं नाही. सर्व पक्ष फ्री झाल्यानंतर बैठक बोलावण्यात येईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

नितीशकुमार म्हणाले, आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावू. आपसात चर्चा करू. त्या आधारावर पुढची रणनीती तयार केली जाईल. पीएम पदाचा मी दावेदार नसल्याचंही नितीशकुमार यांनी स्पष्ट केलं. तसेच राहुल गांधी यांच्या नावाला माझी सहमती असल्याचंही ते म्हणाले.

काँग्रेस नेते कमलनाथ म्हणाले होते की, विरोधी पक्षांकडून संयुक्तपणे राहुल गांधी यांचे नाव २०२४ च्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी घेतले जात आहे. कमलनाथ यांनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांचं कौतुक केलं. राहुल गांधी हे सत्तेसाठी नव्हे तर देशासाठी राजकारण करत असल्याचंही सांगितलं.

कमलनाथ म्हणाले की, देशाच्या इतिहासात एवढी मोठी पदयात्रा निघाली नाही. गांधी कुटुंबाशिवाय देशात अन्य कुटुंबीयांनी कुर्बानी दिलेली नाही. राहुल गांधी हे सत्तेसाठी राजकारण करत नसून, देशासाठी राजकारण करतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.