तिकिटासाठी मुंबईतले काँग्रेस नेते दुबईपर्यंत राहुल गांधींच्या मागे
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक पक्षाती इच्छुकांची धावपळ आता सुरु झाली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमधील अनेक इच्छुक सध्या उत्तर मध्य लोकसभा मतदार संघासाठी कवायत करत आहेत. त्यासाठी काँग्रेसचे नेते मुंबई ते दिल्लीपर्यंतच नाही, तर दुबईमध्ये ही कवायत करत आहेत. काँग्रेसचे वांद्रे पश्चिम […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक पक्षाती इच्छुकांची धावपळ आता सुरु झाली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमधील अनेक इच्छुक सध्या उत्तर मध्य लोकसभा मतदार संघासाठी कवायत करत आहेत. त्यासाठी काँग्रेसचे नेते मुंबई ते दिल्लीपर्यंतच नाही, तर दुबईमध्ये ही कवायत करत आहेत.
काँग्रेसचे वांद्रे पश्चिम येथील माजी आमदार बाबा सिद्दीकी हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नुकतेच अबू धाबीला गेले होते. यावेळी बाबा सिद्दीकी यांनी त्यांची भेटायला वेळ मागितली. मात्र बाबा यांना लोकसभेचं तिकीट हवं असल्याने राहुल गांधी यांनी वेळ देण्यास टाळलं आणि त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचं तिकीट कापलं गेल्याचं सूत्रांकडून कळतंय.
मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात या वेळी कोण निवडून येणार याची उत्सुकता तर सर्वांना आहेच, पण त्याचसोबत कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याची देखील तेवढीच उत्सुकता आहे. खास करून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचं उघडपणे जाहीर केल्यानंतर आता इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ज्याला एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्ता 2005 पासून निवडून येत होत्या. पण 2014 ला आलेल्या मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन येथून निवडून आल्या.