संजय राऊतांनी आघाडी घेतल्याने ईडीचं समन्स, त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतोय – सचिन अहिर

"सध्या आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया ही विधानसभा उपाध्यक्षांच्या टेबलवर सुरु आहे. त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतलेला नाही, तोपर्यंत यांनी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. मात्र माझ्या ज्ञानानुसार सर्वोच्च न्यायालय विधानसभेचा निर्णय येईपर्यंत यात हस्तक्षेप करणार नाहीत.

संजय राऊतांनी आघाडी घेतल्याने ईडीचं समन्स, त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतोय - सचिन अहिर
सचिन अहिर यांची केंद्र सरकारवरती टीका Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 3:37 PM

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांसह बंड केलं त्याला आज सात दिवस पुर्ण झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय नाट्याला सुरूवात झाली. गुजरात बंडखोर आमदारांना अस्थिर वाटू लागल्यानंतर त्यांना आसामच्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये हलवलं. त्यानंतर दोन गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी बंडखोर आमदारांना आणण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी काही अटी घातल्या त्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मान्य नसल्याने त्यांनी समोर येऊन चर्चा करण्याचे आमदारांना सांगितले. दोन गटातला अखेर वाद चिघळला आणि कोर्टात गेला आहे. त्याचबरोबर आज संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्याचबरोबर उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. “अत्यंत दुर्दैवी आहे. यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जातंय. ही चौकशी नंतर ही करता आली असती. पण आज संजय राऊतांनी (Sanjay Raut) जी आघाडी घेतलीये, त्यापासून त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न होतोय का ? पण तरी ही निर्भीडपणे ते जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणार असं सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी सांगितलं.

महाआघाडीचा पाठिंबा काढला

“सध्या आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया ही विधानसभा उपाध्यक्षांच्या टेबलवर सुरु आहे. त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतलेला नाही, तोपर्यंत यांनी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. मात्र माझ्या ज्ञानानुसार सर्वोच्च न्यायालय विधानसभेचा निर्णय येईपर्यंत यात हस्तक्षेप करणार नाहीत. घटनेनुसार जर हे झाले असते तर ते चाललं असतं. प्रत्येक न्यायलयात जाणे ही घाई झाल्याचं दिसतंय. शिवाय महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला हे न्यायालयात सांगितले, म्हणजे न्यायालय शासनाला आदेश देतील असं कधी होत नाही. घटनेनुसार विधिमंडळ, मग राज्यपालांकडे प्रकरण जातं. त्यामुळं तूर्तास तरी न्यायालयात जाऊन सांगणं हे घटनेत बसत नाही. मात्र शेवटी न्यायालय काय निर्णय देत हे पाहावं लागेल” असं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांचं खोचक ट्विट

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापण झाल्यापासून नेत्यांसह मंत्र्यांना केंद्रातील नेतृत्वाकडून टार्गेट केलं जात आहे असं महाविकास आघाडीतील अनेक नेते सांगत आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत अनेक नेत्यांवरती कारवाई देखील केली आहे. तसेच आम्ही केंद्राच्या दबावाला घाबरणार नाही असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारंवार मीडियाला सांगितलं आहे. “मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा! असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.