WITT Satta Sammelan | ही कसली लोकशाही? धाक दाखवून सरकारे तोडत आहेत, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
मध्य प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, गोवा येथे असेच घडले होते. ते सर्वत्र तेच करतात. ते विजयी होऊन परत आले नाहीत तर लोकांना तोडून, धमक्या देऊन परत आले आहेत ही कसली लोकशाही? ही लोकशाही नाही, अशी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : काही लोक सत्तेसाठी भुकेले आहेत. जे लोक कॉंग्रेस सोडून गेले ते 30-40 वर्षे आमच्यासोबत होते. आता कॉंग्रेसच्या विचारधारेत असा कोणता बदल झाला की ही माणसे दूर गेली? काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी बाहेरचे लोकही सामील होत होते. सर्व नेते याची उदाहरणे आहेत. मी आहे त्याच पक्षात आहे. पण, मी निराश झालो का? तर नाही. लोकशाही वाचवणे, संविधान वाचवणे हे माझे ध्येय आहे. मला काही मिळो किंवा न मिळो, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.
Tv9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशातील विविध मुद्द्यांना हात घातला. आता त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये जे काही केले गेले ते योग्य नाही. लोकांनी निवडून दिलेली सरकारे केंद्र सरकारने मोडली. त्यामुळे आता लोकशाहीत धाडस दाखवायला हवे. ते असेच करत राहिले तर एक दिवस देशातील लोकशाही संपुष्टात येईल. राज्यघटना ठप्प होईल. बहुमत मिळाले असेल तर ठीक आहे. परंतु, धमकावून असे करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
त्यांची हमी ही खरी हमी नव्हती…
नेहरूजी, लालबहादूर शास्त्री किंवा राजीव गांधी यांनी असे केले होते का? पण काही लोक सत्तेसाठी भुकेले आहेत. सत्तेत असताना कॉंग्रेसने मनरेगाची, शिक्षणाची, अन्नसुरक्षेची हमी दिली. यूपीए सरकारने जनतेसाठी अनेक योजना सुरू केल्या. जनतेला हमी दिली. परंतु, भाजपने दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या दिल्या का? प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. पण त्यांनी ते दिले कारण त्यांची हमी ही खरी हमी नव्हती अशी टीकाही त्यांनी केली.
जनतेच्या आशीर्वादाने येथे पोहोचलो
1947 मध्ये माझे संपूर्ण घर जळून राख झाले. माझी आई, बहीण, काका गमावले. घरल आग लागली त्यावेळी वडील शेतात काम करत होते. मी कुठे तरी खेळत होतो. त्यांना कुणीतरी सांगितले की इथे शेतात काम काय करताय तिकडे तुमच्या घराला आग लागली आहे. वडिल तिथे गेले. सगळं संपलं होतं. वडीलांनी मला घेतलं आणि ट्रेनने काकांच्या घरी गेलो. तिथल्या कापड गिरणीत त्यांनी काम करायला सुरवात केली. माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले, मला सांभाळले, मोठे केले. त्यानंतर मी विद्यार्थी नेता, कामगार नेता, ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झालो, तेव्हापासून जनतेच्या अखंड आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचले अशी आठवण मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी सांगितली.