शिवसेनेच्या लेडी फायटर… राज्यात चर्चा, जागोजागी सत्कार, काय कारण?
विशेष म्हणजे मुंबईकडे जाताना ही घटना घडली. मात्रे येताना मुंबई ते नाशिक या मार्गावरील सर्व हॉटेल्स त्यांनी बंद करवली होती. त्यामुळे अनेकांना वॉशरुमला जाता आले नाही. आजारी माणसांना त्रास झाला, असा आरोप महिला शिवसैनिकांनी केलाय .
चंदन पुजाधिकारी, नाशिकः दसरा मेळाव्याच्या (Dussehra Melava) दिवशी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. शहापूर जवळ ही घटना घडली. या घटनेची राज्यभरात चर्चा सुरु आहे. त्यानंतर या महिला शिवसैनिकांचा (Lady Shivsena) आता जागोजागी सत्कार केला जातोय. शिंदे गटाचे कार्यकर्ते अश्लील हाव-भाव करत असल्याने आम्ही ती गाडी थांबवून त्यांना जाब विचारला, अशी आपबिती या महिलांनी सांगितली.
टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना या महिलांनी त्या दिवशी काय घडलं याची आपबिती सांगितली. त्या म्हणाल्या, दसऱ्याकरिता आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जल्लोष करत निघालो होतो.
वाटेत ट्युलिप नावाचं हॉटेल आहे. तिथे एक आर्मडा गाडी गेली. आमच्या घोषणा चालू असतानाच गाडीतील कार्यकर्त्यांनी अश्लील इशारे केले. हाव-भाव केले.
आम्ही त्यांना समजवलं. त्यांनी ऐकलं नाही. दोनदा गाडी ओव्हरटेक केली. मग आम्ही ती बस थांबवली.
महिला खाली उतरलो. त्यांना परत समजवण्याचा प्रयत्न केला. त्या गाडीजवळ गेलो तेव्हा एवढा दारूचा वास येत होता…
आम्ही त्यांच्या गाडीची चाबी काढून घेतली तेव्हा त्यांना भानही नव्हतं. आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
त्यानंतर मात्र आम्ही शिवसेना स्टाइलने , ताईगिरीने चोप द्यायला सुरुवात केली.
आम्ही जे केलंय, त्यात चुकीचं नाही. बाळासाहेबांनी अन्यायाविरोधात पेटून उठण्याचं शिकवलं आहे.
आमच्या बाबतीत त्यांनी हे अश्लील कृत्य केल्याने आम्हाला असह्य झालं.
विशेष म्हणजे मुंबईकडे जाताना ही घटना घडली. मात्रे येताना मुंबई ते नाशिक या मार्गावरील सर्व हॉटेल्स त्यांनी बंद करवली होती.
महिलांनी नवरात्रात उपवास केले असतात. त्यांना त्रास देण्यासाठी ही कृती केल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलाय.
त्यामुळे महिलांना वॉशरुमला जाता आले नाही. अनेक आजारी लोकांचे मुंबईतून नाशिककडे येताना हाल झाले, असा आरोप त्यांनी केलाय.