शेंबड्या मुलाला विचारा, बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत उद्धवजींना मुख्यमंत्री बनवलं असतं का? बंडखोर नेता संतापला

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शेंबड्या मुलाचा संदर्भ दिला आहे. रामदास कदम यांनी नेमक्या कोणत्या विषयी ही टीका केली आहे ते पाहा.

शेंबड्या मुलाला विचारा, बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत उद्धवजींना मुख्यमंत्री बनवलं असतं का? बंडखोर नेता संतापला
रामदास कदमImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 1:00 PM

रत्नागिरी : राज्यात (Eknath Shinde) शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर बंडखोर नेत्यांनी थेट (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख यांच्यावरच निशाणा साधण्यास सुरवात केली होती. अद्यापही ती कायम असून कधीकाळी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले रामदास कदम यांनी तर आता आदित्य ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. केवळ स्वार्थासाठी (MVA) महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. बाळासाहेबांनी हे करायला परवानगी दिली असती का? असा प्रश्न शेंबड्या मुलाला जरी विचारला असता तरी उत्तर हे नाही हेच असते असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

पायाखालची वाळू सरकल्याने आता आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत. मातोश्रीचे दरवाजे उघडे, पक्षाचे दरवाजे उघडे असे म्हणत ते राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. पण त्याचा आता उपयोग नाही. सत्ता असतानाच ही भूमिका घेतली असती तर ही दुर्देवी वेळही आली नसती असेही कदमांनी सुनावले आहे.

योगेश कदम आणि आदित्य ठाकरे हे मित्र असल्याचे सांगितले जात होते पण वास्तव हे वेगळेच होते. दापोलीच्या नगरपरिषदेची सुत्रे ही योगेश कदम यांच्याकडेच होती. पण यामध्ये राजकारण करीत ही नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्यात आली होती. त्यावेळी तुमची मैत्री कुठे गेली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाबरोबर युती करुन यांनीच खऱ्या अर्थाने गद्दारी केली होती. सध्याचे सरकार हे जनतेच्या मनातले आहे. जनतेला तर नाहीच पण बाळासाहेब ठाकरे यांना देखील हे मान्य झाले नसते, आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना कधीच अशा युतीमध्ये सहभागी होऊ दिले नसते. मात्र, जे झाले स्वार्थासाठी असा टोला कदमांनी लावला आहे.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रिमंडळात आले होते. त्यांच्या अशा कर्तृत्वामुळेच वेदांता हा प्रकल्प गुजरातला गेला. आता या प्रकल्पावरुन राज्य सरकार टीका करणे म्हणजे चुकीचे आहे. सर्वकाही महाविकास आघाडीच्या काळात घडले आणि आता आरोप हे शिंदे सरकारवर केले जात आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.