भांडणे थांबवा आणि शरद पवारांना मुख्यमंत्री करा, काँग्रेस कार्याध्यक्षांची मागणी
महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर (Yashomati Thakur supports Sharad Pawar for CM) यांनी, शरद पवारांना मुख्यमंत्री केल्यास आमचा पाठिंबा असेल, असं जाहीर केलं.
अमरावती : भाजप-शिवसेना सत्तास्थापनेचा तिढा अद्याप मिटला नसताना, महाराष्ट्रात सरकार स्थापन्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सुप्त हालचाली सुरु आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने आपण विरोधातच बसणार असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे दिल्लीवारी करुन आलेले काँग्रेस नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सांगत आहे. त्यातच शरद पवार मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असं नवंच सूत्र चर्चेला आलं. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर (Yashomati Thakur supports Sharad Pawar for CM) यांनी, शरद पवारांना मुख्यमंत्री केल्यास आमचा पाठिंबा असेल, असं जाहीर केलं. त्या (Yashomati Thakur supports Sharad Pawar for CM) अमरावतीत बोलत होत्या.
यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील यावली येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतात पाहणी केली. यावेळी त्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत विचारण्यात आलं.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, “सेना-भाजपने भांडण सोडून शेतकऱ्यांकडे लक्ष द्याव. अन्यथ सरळ शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा आम्ही काँग्रेसवाले त्यांच्यासोबत जाऊ” शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्या अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.
पावसामुळे तिवसा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाले आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी यावली येथे सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झालेल्या एका शेतात भेट दिली.
Today visited to farms n farmers for taking ahead those issues facing due to rain fall. @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @JaiMaharashtraN @INCMaharashtra @MaharashtraPMC @IYCMaha @INCMumbai pic.twitter.com/yoEa5d8VTC
— Adv. Yashomati Thakur (@MLAYashomatiT) November 3, 2019
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. पण राज्यात भाजप शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरुन वाद होत आहे. हा वाद थांबवून आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
संंबंधित बातम्या
काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा रुद्रावतार, जलसंपदा अधिकाऱ्याला इंग्रजीत झापलं!
विधानसभेत महिला आमदारांच्या संख्येत वाढ, कोणत्या पक्षाच्या किती महिला आमदार?