Sanjay Rathod : ’52 मिनिटांच्या सीडीमध्ये पुरावा, संजय राठोडांनीच पूजा चव्हाणला मारलं’ शिवसैनिकाचा थेट इशारा

Pooja Chavhan Suicide Case : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे संजय राठोड यांनी मंत्रिपद गमावलं होतं.

Sanjay Rathod : '52 मिनिटांच्या सीडीमध्ये पुरावा, संजय राठोडांनीच पूजा चव्हाणला मारलं' शिवसैनिकाचा थेट इशारा
संजय राठोड, पूजा चव्हाणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 9:51 AM

शिवसेनेविरुद्ध बंड (Shiv sena Rebel) पुकारल्यानंतर आता थेट शिवसैनिकांनीच संजय राठोड (Sanjay Rathod) यांना इशारा दिला. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे मंत्रिपद राठोड यांना गमवावं लागलं होतं. त्यानंतर आता चक्क शिवसैनिकांनीच गंभीर आरोप संजय राठोड यांच्यावर केलाय. पूजा चव्हाण (Pooja Chavhan) प्रकरणातील पुरावे सीडीच्या माध्यतातून समोर आणू, अशी धमकी शिवसैनिकांनी संजय राठोड यांना दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजलीय. संजय राठोड हे सध्या गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर करत आहेत. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी संजय राठोडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलंय. गेल्या आठ दिवसांपासून बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी गुवाहाटीमध्ये पलायन केलंय. शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपशी युती करावी, अशी बंडखोर आमदारांची मागणी आहे.

संजय राठोड यांच्यावर कुणी केला आरोप?

संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातून येतात. संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी त्यांच्यावर संपात व्यक्त केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातले पुरावे समोर आणण्यासोबत या प्रकरणातील एक सनसनाटी 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे आहे, ती बाहेर काहेर काढू आणि संजय राठोड यांनी बंजारा समाजाची मुलगी कशी मारली हे त्यातून उघड करु असं इशारा देण्यात आलाय. शिवेसनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी हा इशारा दिलाय.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे संजय राठोड यांनी मंत्रिपद गमावलं होतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना कॅबिनेटमध्ये घेतलं जाऊ शकतं, अशी चर्चाही सुरु होती. मात्र राज्यसभेनंतर विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारलं. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या मतदारसंघातील शिवसैनितांनी संताप व्यक्त केलाय.

हे सुद्धा वाचा

काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?

बीडमधील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केलेली. तिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालेली. तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले होते. या आरोपानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पूजा चव्हाणच्या कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय राठोड कुटुंबासह नॉट रिचेबल झालेले. काही काळानंतर ते पुन्हा बंजारा समाजातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले. अखेरीस पुण्यातील वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसल्याचा खुलासा केला होता. पुजाचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा खुलासा पोलिसांनी केल्यानंतर संजय राठोड यांना दिलासा मिळाला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.