महाराष्ट्र, झारखंड नव्हे, ‘या’ राज्यातून लागणार मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी; कुणी केली सर्वात मोठी भविष्यवाणी?
लोकसभेत चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपाला अडीचशे जागांवर समाधान मानावे लागेल. त्यानंतर आता हरियाणात भाजपाला यश मिळाले आहे. परंतू भाजपाचा खरा कस महाराष्ट किंवा झारखंड नसून या राज्यातून लागणार असल्याचा दावा एका तज्ज्ञाने केला आहे.
Haryana Election Result 2024 : हरियाणा आणि काश्मीरमधील निकाल हाती आले आहेत. हरियाणात पुन्हा भाजपाचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर कश्मीरात कॉंग्रेसच्या इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. परंतू महाराष्ट्रात या निकालाचा काय परिणाम होणार याची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र आणि झारखंड निवडणूकांतून कदाचित भाजपाचा विजय देखील होईल मात्र या एका राज्यातून भाजपाचा आलेख घसरु शकतो असा दावा करण्यात येत आहे.
भाजपात सुरुवातीला कॉंग्रेसच्या बाजूने आकडे येत होते. त्यातच सर्व एक्झिट पोल देखील हरियाणात कॉंग्रेसचे सरकार येणार असा अंदाज व्यक्त केला होता. परंतू अखेर भाजपाचेच सरकार हरियाणात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वात निवडणूक आकडे तज्ज्ञ योगेंद्र यादव यांनी भाजपाच्या लोकप्रियते संबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. भाजपा महाराष्ट्र आणि झारखंड निवडणूकांतून कदाचित तरुन जाईल, मात्र बिहार राज्यातील निवडणूकांमध्ये भाजपाचा खऱ्या अर्थाने कस लागणार असल्याचे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.
योगेंद्र यादव पुढे म्हणाले की भाजपाची खरी परीक्षा बिहार विधानसभा निवडणूकीतच होईल. जर एनडीए आघाडीला बिहारमध्ये फटका बसला तर नरेंद्र मोदी, भाजपा आणि एनडीएच्या घसरणीला सुरुवात होईल. याचा थेट परिणाम साल 2028 होणाऱ्या लोकसभा निवडणूकांवर होणार आहे. येथे भाजपाला झटका लागण्याची शक्यता आहे.