देशात एनडीएचेच सरकार येईल : योगेंद्र यादव
नवी दिल्ली : राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच (NDA) बहुमत मिळण्याची जास्त शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी त्यांनी एनडीएच्या यशात सर्वात मोठा वाटा विरोधीपक्षांच्या अपयशाचा असेल, असेही नमूद केले. आपला अंदाज वर्तवताना योगेंद्र यादव म्हणाले, “अपेक्षा आणि अंदाज यात फरक करायला हवा. आकडेवारी खोटं बोलत नाही. विरोधीपक्ष अपयशी आणि नालायक […]
नवी दिल्ली : राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच (NDA) बहुमत मिळण्याची जास्त शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी त्यांनी एनडीएच्या यशात सर्वात मोठा वाटा विरोधीपक्षांच्या अपयशाचा असेल, असेही नमूद केले.
आपला अंदाज वर्तवताना योगेंद्र यादव म्हणाले, “अपेक्षा आणि अंदाज यात फरक करायला हवा. आकडेवारी खोटं बोलत नाही. विरोधीपक्ष अपयशी आणि नालायक ठरले. विरोधीपक्षांतील एकजुटीच्या अभावानेच एनडीएला बहुमत मिळेल. काही जागा कमी पडल्या तरी एनडीएला इतर पक्षांची मदत मिळेल.”
लोकसभेच्या निकालाचा अंदाज वर्तवताना योगेंद्र यादव यांनी 3 शक्यता वर्तवल्या. त्यापैकी एक म्हणजे एनडीएला बहुमत मिळेल, भाजपला बहुमत मिळेल किंवा तिसरी एनडीएला 4 किंवा 5 कमी पडतील आणि अन्य पक्ष त्यांना मदत करतील.
Tv9-C Voter Exit Poll ने वर्तवलेल्या आकडेवारीनुसार देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे शक्यता आहे. भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एनडीए आणि यूपीए वगळता इतर पक्षांना 127 जागा मिळतील, असेही या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
देशात कुणाला किती जागा?
- एनडीए – 287
- यूपीए – 128
- इतर – 127
यामध्ये भाजप पक्षाला 236 जागा आणि भाजपप्रणित एनडीएला 287 जागा मिळतील. म्हणजेच, भाजपला 2014 च्या तुलनेत देशभरात 46 जागांवर फटका बसणार आहे, असे एक्झिट पोलमधून समोर आले आहे.
विशेष म्हणजे, इतर पक्षांमध्ये सपा, बसपा, बीजेडी, टीएमसी, टीडीपी इत्यादी महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जागाही ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे.
इतर पक्षांना किती जागा?
- सपा-बसपा – 40
- तृणमूल काँग्रेस – 29
- बिजू जनता दल – 11
- तेलंगणा राष्ट्र समिती – 14
- टीडीपी – 14
- इतर – 19
एग्झिट पोल | भाजप + | काँग्रेस + | इतर |
---|---|---|---|
टीव्ही 9-सी व्होटर | 287 | 128 | 127 |
टाईम्स नाऊ –VMR | 306 | 132 | 104 |
एबीपी-नेल्सन | 267 | 127 | 148 |
न्यूज 24 – टुडेज चाणक्य | 340 | 70 | 133 |
न्यूज नेशन | 282-290 | 111-126 | 130-138 |
न्यूज 18- IPSOS | 336 | 82 | 124 |
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट | 287 | 128 | 127 |
न्यूज एक्स | 242 | 164 | 136 |
रिपब्लिक – जन की बात | 305 | 124 | 87 |