‘मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार’, भाजप आमदाराचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, कायदेशीर कारवाईचाही इशारा

मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्यानं आणि खेळाचे मैदान पूर्णपणे नामशेष झाले आहेत, असा आरोप करत भाजप आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

'मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार', भाजप आमदाराचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, कायदेशीर कारवाईचाही इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार योगेश सागर
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 6:13 PM

मुंबई : मुंबईचा विकास आराखडा (Mumbai Development Plan) मंजूर कराताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. परंतू मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) भ्रष्ट कारभारामुळे आता उद्यानं आणि खेळाचे मैदान पूर्णपणे नामशेष झाले आहेत, असा आरोप करत भाजप आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. मुंबई महापालिका अजमेरा बिल्डरवर मेहेरबान आहे. मुंबईतील शहरातील उद्यानांसाठी लागणारी जागा महापालिकेनं अजमेरा बिल्डरला दिल्याचा गंभीर आरोप योगेश सागर यांनी केला आहे.

योगेस सागर यांचा नेमका आरोप काय?

मुंबई शहरातील उद्यानांसाठी असणारी जागा महापालिकेनं अजमेरा बिल्डरला दिली आहे. त्या बदल्यात बफर झोनमध्ये असणारी लँड लॉकिंग जागा जी विकासासाठी अनुकूल नाही ती ताब्यात घेतली आहे. यात सरळ सरळ 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईकरांची हक्काची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचं गंभीर आरोप योगेश सागर यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही केराची टोपली दाखवली. बिल्डरवर एवढं विशेष मेहेरबानी दाखवत महापालिकेचं 500 कोटीचं नुकसान केलं. हा निर्णय मागे घेतला नाही तर या विरोधात भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशाराही सागर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून दिला आहे.

योगेश सागर यांचं पत्र जसच्या तसं

मुंबईचा विकास आराखडा मंजूर करताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. पंरतु मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारमुळे आता उद्याने व खेळाचे उद्याने पुर्णपणे नामशेष झाले आहेत.

अशा परिस्थिति मनपाच्या ताब्यातील उद्यानाकरिता आरक्षित, कोणतेही अतिक्रमण नसलेला बांधकाम योग्य भूखंड अजमेरा बिल्डरला अदलाबदलती देण्यात आला आहे. बदल्यात अजमेरा बिल्डरकडे असणारा बांधकाम अयोग्य व पर्यावरणविषयक परवानग्याच्या कचाट्यात अडकणारा भूखंड मुंबई महापालिकेने माहुल पम्पिंग स्टेशनकरिता ताब्यात घेतला आहे.

परंतु यातील खरा गैरव्यवहार स्पष्ट आहे, तो म्हणजे अजमेरा बिल्डरची पर्यावरणविषयक परवानग्या मिळवण्याच्या अनंत अडचणीतून सुटका करणे आणि या आदलाबदलीच्या व्यवहारात त्याचा सरळ सरळ 500 कोटींचा फायदा करून देणे ! त्यामुळे मुंबईकरांची हक्काची जमिन बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट सत्ताधरी सेना व महाविकास आघाडीच्या साथीदारांनी घातला आहे.

गंभीर बाब म्हणजे सुधार समितीच्या नोव्हेंबर 2021च्या सभा विषय क्रमांक ६ मधील संदर्भीत भूखंडासाठी मुंबई मनपाने अधिग्रहणाकरित विकास अधिकार प्रमाणपत्र (DRC) श्री.ईश्वरलाल अजमेरा यांच्या नावाने 39554.60 क्षेत्राकरीता दि. 12-02-2002 रोजी निर्गमित केले होते. आता परत तोच भूखंड आपण 19 वर्षाने त्याच अजमेरा व इतर सहा जणांच्या विकासकांच्या ताब्यात देत आहोत असे प्रस्तावावरून निर्देशीत होते.

सर्वोच्च न्यालयाने निर्गमित केलेल्या कायद्या प्रमाणे एकदा कुठलाही भूखंड सार्वजनिक प्रयोजनाकरिता अधिगृहित केला असल्यास पुन्हा तो जमिन मालकाला किंवा खासगी व्यक्तीला देता येत नाही पण भ्रष्टाचारी सेना व अधिकारी एवढे मग्रूरीत आहेत की ते सर्वोच्च न्यायलयाने घातलेला पायंडा पायाखाली तुडवत आहे.

विशेषत: या आदला बदलीच्या प्रस्तावावर सभागृहात कोणतही चर्चा न करता मंजूरी कशाप्रकारे देण्यात आली? याचा अर्थ ही आदला बदल फक्त भूखंडाचे श्रीखंड चाखण्यासाठीच केली गेली, हे स्पष्ट आहे.

आपण या 500 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्वरीत स्थगितीचे आदेश निर्गमित करावे अन्यथा मला योग्य त्या कायदेशीर बाबीचा मार्ग स्वीकारावा लागेल.

इतर बातम्या :

Goa Assembly Election 2022 : गोवा, उत्तर प्रदेशात शिवसेना दंड थोपटणार? संजय राऊतांचा मोठा दावा

Punjab Uttarakhand Election Result and Voting Date : पंजाब आणि उत्तराखंडमध्ये निवडणुकीचा धुरळा कधी उडणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.