Video : ‘जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाही, तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य’ खासदाराच्या वादग्रस्त विधानावर भाजपने व्यक्त केला संताप

डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम के स्टॅलिन हेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. अशात त्यांच्याच पक्षातील खासदार ए राजा यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. तामिळनाडूतील एका कार्यक्रमात बोलताना ए राजा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

Video : 'जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाही, तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य' खासदाराच्या वादग्रस्त विधानावर भाजपने व्यक्त केला संताप
वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापलंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 12:47 PM

मुंबई : जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाही, तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य आहात, असं वादग्रस्त विधान (Controversial Statement) एका खासदारानं केलं आहे. वादग्रस्त विधान करणाऱ्या या खासदाराचं नाव ए राजा असं आहे. ते तामिळनाडूतील (Tamilnadu) द्रमुक पक्षाचे नेते (DMK Leader) आहेत. त्यांचा व्हिडीओ तामिळनाडूतील भाजपच्या अध्यक्षांनी ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. डीएमके खासदार ए राजा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता राजकारण तापलंय. द्वेष पसरवणारं विधान केल्यावरुन सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

ए राजा यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. ए राजा यांनी केलेलं विधान खेदजनक आहे, असं म्हणत के अन्नामलाई यांनी ट्वीट केलं आहे. के अन्नामलाई हे तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष आहेत. एका ट्वीटमध्ये के अन्नामलाई यांनी खासदार ए राजा यांचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी नेमकं काय विधान केलं, याचा पुरावाही दिलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडमोडी : Video

तमिळ भाषेत ए राजा यांनी हे विधान केलं होतं. याआधीही ए राजा हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी जातीयवादी वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर भाजपने टीका केलीय. खासदार ए राजा यांच्यासारख्या राजकारण्यांच्या विचारसरणीवरच सवाल उपस्थित करत भाजपच्या तामिळनाडूतील प्रदेशाध्यक्षांनी सवाल उपस्थित केलाय. ए राजा यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैवी असल्याचंही ते म्हणालेत.

‘त्या’ वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ

डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम के स्टॅलिन हेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. अशात त्यांच्याच पक्षातील खासदार ए राजा यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. तामिळनाडूतील एका कार्यक्रमात बोलताना ए राजा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूमध्ये नमक्काल इथं आयोजित एका कार्यक्रमात ए राजा बोलत होते. त्यावेळी त्यांनी हिंदू धर्म, जाती, अस्पृश्य यांच्या अनुषंगाने गरळ ओकणारं विधान केलं.

तमिळ भाषेत केलेल्या विधानात ए राजा यांनी असं म्हटलं आहे की,…

वर्णव्यवस्थेतली सर्वात खालची जात असलेल्या शुद्र जातीतील मुलं ही वेश्यांची मुलं आहे. जो पर्यंत ही मुलं हिंदू धर्माचे पाईक होणार नाही, तो पर्यंत ते शुद्रच राहतील. जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाही, तोपर्यंत तुम्ही शुद्रच राहाल. जोवर तुम्ही हिंदू होत नाही, तोवर तुम्ही दलितच आहात. जोवर तुम्ही हिंदू होत नाही, तोवर तुम्ही अस्पृश्यच आहात.

इतकंच काय तर ए राजा यांनी सुप्रीम कोर्टाबाबत एक वादग्रस्त विधान केलं. सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटलंय, की..

जर तुम्ही ख्रिश्चन, मुस्लिम किंवा पारसी नसाल, तर तुम्ही हिंदू असायला हवं, असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. ही असं दुसऱ्या कोणत्या देशात तुम्ही पाहिलंय का?

यात त्यांनी पुढे लोकांना जातीबाबत सवाल उपस्थित करण्याचं आवाहन केलंय. सनातन धर्मातील जाती व्यवस्थेवर तुम्ही बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले. तुमच्यापैकी किजी जणांना वेश्येचा मुलगा किंवा अस्पृश्याचा व्हायचंय, असं जेव्हा तुम्ही मोठ्याने विचाराल तेव्हाच सनातनाची मुळं नष्ट होईल, असंही ते पुढे म्हणालेत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.