Nana Patole : तुम्ही ने दर्द दिया, तुम्ही ने दवा देना, नाना पटोलेंची भाजपवर टीका, एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा
मी मंत्रीमंडळात नव्हतो. एकनाथ शिंदे यांना कशी वागणूक मिळत होती. ते मला माहीत नाही. मी कधी मंत्रालयातही गेलो नाही. त्यामुळं त्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आमचा मित्र. आमच्याबरोबर काम करणारा एक सहकारी. राज्याचा मुख्यमंत्री बनतो. त्याचा आम्हाला आनंद आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. शिंदेंना मुख्यमंत्री करून फडणवीसांनी सामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो, असा संदेश दिला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळं तुम्ही ने दर्द दिया, तुम्ही ने दवा देना, अशी परिस्थिती सध्या भाजपची झालेली आहे. ही सर्व उठापठक करून. संविधानिक प्रक्रियेला (Constitutional Process) बाजूला सारून नवीन सरकार (State Government) ही भाजपच्या सपोर्टनं होत आहे, असं पटोले म्हणाले. ज्यांनी दर्द दिला तेच आता उपाय शोधण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण, जुना सहकारी मुख्यमंत्री होतो. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा असंही ते म्हणाले.
शिंदेंनी राज्याच्या विकासासाठी काम करावं
नाना पटोले म्हणाले, एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा. राज्याच्या विकासासाठी, जनतेसाठी भरपूर काम करावं, अशी अपेक्षा आहे. भाजपच्या अंतर्गत समस्या आहेत. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजपचे मुख्यमंत्री का झाले नाहीत, यावर प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. राज्याचा विकास खुंटत होता, असं शिंदे म्हणतात. शिंदे हे मंत्रीमंडळात होते. ते सेनेचेच मुख्यमंत्री होते. त्यामुळं त्यामध्ये मी काही बोलावं हे योग्य नाही. शिंदे यांनी काय मत मांडायचं तो त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांनी काय करायचं त्या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. शेवटी यात काय झालं. काय नाही झालं, हे सर्व सर्वांच्या समोर आहेत. त्यामुळं या सर्व प्रकरणावर शिवसेनेकडून चर्चा झाली तर बरं.
शिंदेंना कशी वागणूक मिळाली मला माहीत नाही
मी मंत्रीमंडळात नव्हतो. एकनाथ शिंदे यांना कशी वागणूक मिळत होती. ते मला माहीत नाही. मी कधी मंत्रालयातही गेलो नाही. त्यामुळं त्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आमचा मित्र. आमच्याबरोबर काम करणारा एक सहकारी. राज्याचा मुख्यमंत्री बनतो. त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळं आमच्या त्यांना शुभेच्छा, असं नाना पटोले यांनी सांगितलं.