Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : वय हा फक्त आकडा, सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना टोला

Supriya Sule : भारतीय जनता पक्षावर आसूड ओढतानाच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर पण हल्ला चढवला. बापाचा नाद नाही करायचा, असा सज्जड दम त्यांनी विरोधकांना भरला.

Supriya Sule : वय हा फक्त आकडा, सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना टोला
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 3:57 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादीतील (NCP Crisis) दोन गटांनी आजचा दिवस गाजवला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी, प्रत्येकाचा एक काळ असतो, असे सूचवत, शरद पवार यांनी आता आशिर्वाद द्यावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले. काळानुसार, राजकारण बदलावं लागते, निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी सुचवले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वयाचा दाखला देणाऱ्या नेत्यांना सुनावले. वय हा फक्त आकाड आहे, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. आमच्यावर किती पण टीका करा. पण बापाचा नाद करायचा नाही, असा सज्जड दम त्यांनी विरोधकांना भरला. शाब्दिक चकमकीला आजपासून सुरुवात झाली आहे. आता या फैरी कोणत्या पातळीवर जातील, हे येत्या काही दिवसात उभा महाराष्ट्र पाहणार आहे.

भारतीय जनता पक्षावर तोंडसूख सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर चांगलेच तोंडसूख घेतले. भाजपनेच राष्ट्रवादीत खोडा घातल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ आहे. हाच धागा पकडत त्यांनी भाजप हा सध्या सर्वात भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा घणाघात केला. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी भाजपाच, राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत बसल्याचा अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनावले. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. वाय. बी. चव्हाण सभागृहात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

वय हा केवळ आकडा काही लोक, आता वय झाल्याने जेष्ठ नेत्यांनी केवळ आशिर्वाद द्यावेत असा सूर आवळत आहे. पण वय हा केवळ आकडा आहे. तुम्ही 2019 चा इतिहास तुम्ही विसरला असाल, आम्ही विसरलो नाही, भारतीय जनता पक्षाविरोधात एका सभेने कसे पारडे पलटवले याचा दाखल देत सुप्रिया सुळे यांनी भाजपच नाही तर अजित पवार यांना पण टोला लगावला.

हे सुद्धा वाचा

संघर्ष करणार त्यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, हे इतके वय झाले असताना टाटा समूह सक्षमपणे सांभाळत असल्याचा दाखला दिला. त्यांनी कोरोनाची लस देणारे पुनावाला यांचा उल्लेख केला. फारुक अब्दुला हे तर शरद पवार यांच्या पेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांनी आपण या वयात लढत असल्याचे सांगत, संघर्ष करण्याचा सल्ला दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आपण संघर्ष करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अडचणीच्या काळात मुली धाऊन येतात. जे मुलं आपल्या वडिलांना, घरी बसून तुम्ही आता आशिर्वाद द्या, असा सल्ला देतात, त्यापेक्षा मुली परवडल्या असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. घरावर संकट आले, अडचण आली की मुलीच धाऊन येतात, असे सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

योद्ध्याने एकहाती जागा जिंकल्या जे गेले त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्या. 2019 चा इतिहास तुम्ही विसरला असाल, आम्ही विसरलो नाही, याची आठवण त्यांनी अजित पवार गटाला करुन दिली. भर पावसात शरद पवार यांनी सभा गाजवली. त्यानंतर सर्व बाजी पालटली याची आठवण त्यांनी करुन दिली. आम्ही पक्ष पुन्हा बांधू, असा निर्धार ही त्यांनी व्यक्त केला.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.