Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thorat : प्रतिसाद नव्हता म्हणता, मग आता यात्रा कशाला काढता, भारत जोडो यात्रेवरील टिकेवरुन बाळासाहेब थोरात यांनी साधला कोणावर निशाणा

Balasaheb Thorat : भारत जोडो यात्रेवर टीका करणाऱ्यांचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तोंडसूख घेतले..

Balasaheb Thorat : प्रतिसाद नव्हता म्हणता, मग आता यात्रा कशाला काढता, भारत जोडो यात्रेवरील टिकेवरुन बाळासाहेब थोरात यांनी साधला कोणावर निशाणा
यात्रेवरुन साधला निशाणाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 10:19 PM

अहमदनगर : भारत जोडो यात्रेवरुन (Bharat Jodo Yatra) देशात रणकंदन सुरु आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) ही काँग्रेस जोडो यात्रा असल्याची घणाघाती टीका केली. एवढेच नाही तर राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) चालण्यासाठी कलाकार, सेलिब्रेटींना पैसा मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर भाजपने ही यात्रेचा हा ट्रेंड इनकॅश करण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप करत  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी चांगलेच तोंडसूख घेतले आहे.

भाजपने भारत जोडो यात्रेला कायम हिणवले. बोचरी टीका केली. यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असताना शेलकी भाषेत टीका केली, मग आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कशाला यात्रा काढत आहेत, असा खोचक सवाल थोरात यांनी विचारला आहे.

भारत जोडो यात्रेला दक्षिणेतून सुरुवात झाली. तेव्हापासून यात्रा चर्चेत आहे. यात्रेला प्रत्येक राज्यात अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात तर या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाल्याचे थोरात यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

ही केवळ काँग्रेसची यात्रा असल्याचा भाजपचा आरोप थोरात यांनी फेटाळून लावले. ही यात्रा एक विचार घेऊन चालली आहे. यात्रेत महागाई, बेरोजगारी, समाजातील ऐक्य अशा प्रश्नावर विचार मंथन सुरु असून लोकांमधून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

बावनकुळे यांना यात्रा काढण्याचा अधिकार आहे. पण भारत जोडो यात्रेवर टिका करणाऱ्यांना आताच यात्रा काढण्याची आवश्यकता का पडली? यामागे भारत जोडो यात्रेला मिळणारा वाढता प्रतिसाद तर कारणीभूत नाही ना? असा चिमटा थोरात यांनी काढला.

भाजपच्या यात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबतही थोरात यांनी बाजू मांडली. भाजपला काही करु द्यात, काँग्रेस मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.