Fact Check: खरंच तरुणानं गर्लफ्रेंड पटत नाही म्हणून आमदाराला पत्रं लिहिलं? वाचा नेमकं काय प्रकरण आहे?

एका पठ्ठ्याने चक्क गर्लफ्रेंड मिळावी यासाठी थेट आमदार महोदयांना पत्र लिहिल्याचा एक प्रकार चंद्रपूरच्या राजुरामध्ये समोर आला होता. ते कथित पत्र लिहिणारा युवक अखेर सापडला आहे. पत्राखाली नाव असलेल्या भूषणच्या मित्रांनी सर्व कारभार केल्याचा धक्कादायक खुलासा आता झालाय.

Fact Check: खरंच तरुणानं गर्लफ्रेंड पटत नाही म्हणून आमदाराला पत्रं लिहिलं? वाचा नेमकं काय प्रकरण आहे?
गर्लफ्रेन्ड मिळावी म्हणून थेट आमदाराला पत्र
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 9:03 PM

चंद्रपूर : लोक आपले काम मार्गी लावण्यासाठी, अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना पत्र लिहिलात. मात्र एका पठ्ठ्याने चक्क गर्लफ्रेंड मिळावी यासाठी थेट आमदार महोदयांना पत्र लिहिल्याचा एक प्रकार चंद्रपूरच्या राजुरामध्ये समोर आला होता. ते कथित पत्र लिहिणारा युवक अखेर सापडला आहे. पत्राखाली नाव असलेल्या भूषणच्या मित्रांनी सर्व कारभार केल्याचा धक्कादायक खुलासा आता झालाय. भूषणला याबाबत कल्पनाही नसल्याचं उघड झाले आहे! (young boy wrote a letter to MLA Subhash Dhote to get a girlfriend)

राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथील भूषणच्या मित्रांनी त्याच्या नावाने गंमतीने लिहून हे पत्र व्हायरल केलं होतं. आमदार सुभाष धोटे आपल्याला वडीलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचं भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केलं आहे. या कृतीविषयी सर्वांना पश्चाताप असल्याचं सांगत त्यांनी त्यानी जाहीर माफी मागितली आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकर्त्यानी या युवकाला शोधून काढल्यावर आमदार धोटे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि त्या युवकांशी संवाद साधला.

पत्रात नेमकं काय?

प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड महोदय, सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा

आपला प्रेमी भूषण जांबुवंत राठोड

आमदारांना पत्रच मिळालं नाही

दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला असून क्षेत्रातील कार्यकर्त्यांना हा युवक शोधण्यास सांगितल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो सापडलाच तर त्याची समस्या विचारपूस करून दूर करता येईल मात्र अशा पद्धतीने पत्रप्रपंच योग्य नव्हे असेही त्यांनी म्हटले आहे.

तरुणांकडून आमदार महोदयांसमोर दिलगिरी व्यक्त

सोशल मीडियावर हे पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. या पत्राची दखल घेत आमदार सुभाष धोटे यांनी यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि त्या युवकांशी संवाद साधला. भूषणच्या मित्रांनी त्याच्या नावाने गंमतीने लिहून हे पत्र व्हायरल केलं होतं. आमदार सुभाष धोटे आपल्याला वडीलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचं भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केलं आहे. तसंच याबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. इतर बातम्या : 

प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन, तर उस्मानाबादेत वंगण फासण्याचा इशारा

दरेकरांचं ‘रंगलेल्या गालाचं मुका प्रकरण’, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

young boy wrote a letter to MLA Subhash Dhote to get a girlfriend

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.