‘ओ काका आमचा एक फोटो काढा की’…म्हणत विनंती, अन् मंत्री झाले फोटोग्राफर

ओ काका आमचा एक फोटो काढा की, असे म्हणत थेट दत्तात्रय भरणे यांना फोटो काढण्याची विनंती तरुणांनी केली.

'ओ काका आमचा एक फोटो काढा की'...म्हणत विनंती, अन् मंत्री झाले फोटोग्राफर
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:56 PM

मुंबई : कुठलाही मंत्री म्हटलं की गाड्यांचा ताफा, त्याच्याभोवती असलेली कार्यकर्त्यांची गर्दी, असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. विशेष म्हणजे त्याची ऐट, चालण्या बोलण्यातला रुबाबही आपल्या नजरेत तरळून जातो. मात्र, आपल्याकडे असेही काही नेतेमंडळी आहेत, जे कितीजरी मोठ्या पदावर असले तरी, ते सैजन्य आणि त्यांची जनतेप्रती असलेली बांधिलकी ही कायम जपत असतात. आपल्या वागण्या-बोलण्यातून ते सर्वांच्या मनात घर करतात. असाच एक किस्सा मृदा आणि जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बाबतीत घडला. (youth of mumbai requested Dattatray Bharne to click photos)

दत्तात्रय भरणे तरुणांचे काका

तर झालं असं, की सध्या मुंबई शहरात थंडी प्रवेश करु लागली आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे वातावरणातील थंडावा आणि मंद हवेतील गारव्याचा अनुभव घेण्यासाठी शहरातील तरुण मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने जमत आहेत. असेच काही तरुण सोमवारीसुद्धा मरीन ड्राईव्हवर जमले होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मरीन ड्राईव्हवर इव्हनिंग वॅाक करण्यासाठी बाहेर आले. इकडे तरुण गप्पांमध्ये दंग होते आणि भरणेंचं लक्ष चालण्याकडे होतं. यावेळी अचानक काही तरुणांनी “ओ काका आमचा एक फोटो काढा की,” असे म्हणत, थेट दत्तात्रय भरणे यांना फोटो काढण्याची विनंती केली.

अन् भरणे झाले फोटोग्राफर

एरव्ही तरुण मंडळी वेगवेगळ्या नेत्यांसोबत फोटो काढण्यासाठी धडपडत असतात. मात्र, थेट तरुणांनीच थेट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोटो काढण्याची विनंती केली. बरं एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर भरणे यांच्या हातात मोबाईल देत तरुणंडळी फोटोसेशनसाठी रेडीही झाले. यावेळी भरणे यांनी कुठलेही आढेवेढे न घेता तरुणांचे अनेक फोटो काढले. तरुणांच्या विनंतीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चक्क फोटोग्राफर झाले. यावेळी भरणे यांनी तरुणांसोबत मनमोकळ्या गप्पा केल्या. त्यानंतर मुलांनीही भरणे यांच्यासोबत अनेक फोटो काढत हा प्रसंग काळाच्या स्मृतीवर कैद केला. (youth of mumbai requested Dattatray Bharne to click photos)

दत्तात्रय भरणे यांचा हा एकच किस्सा आहे असं नाही. वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावताना ते नेहमीच सामाजिक भान जपताना दिसातात. राज्यात कोरोना संसर्ग अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. 1 नोव्हेंबर रोजी दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर तालुक्यात एका खासगी कार्यक्रमात गेले होते. यावेळीसुद्धा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांनी स्वत:हून दंड भरला होता. (youth of mumbai requested Dattatray Bharne to click photos)

…आणि भरला 100 रुपये दंड

यावेळी इंदापुरात कार्यक्रमात भाषण करत असताना त्यांनी लावलेला मास्क अचानकपणे निसटला. नियमांचे उल्लघन केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्व:तहून लासुर्णे ग्रामपंचायतीकडे 100 रुपयांचा दंड भरला होता. यावेळी भरणे यांनी नागरिकांना कोरोनाबाबतच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. तसेच कार्यक्रमात विनामास्क आलेल्या नागरिकांना त्यांनी मास्क लावण्याच्या सूचनादेखील केल्या होत्या.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचे, त्यामागे अहमदभाई आहेत : उद्धव ठाकरे

मोठी बातमी | अभिनेते कमल हासन स्वतः निवडणूक रिंगणात, कोणत्या मतदारसंघातून लढणार?

सोनियांचाही शब्द डावलणारे ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण?; रणपिसेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

(youth of mumbai requested Dattatray Bharne to click photos)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.