Farewell to Naidu : व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेत निरोप, तरुणांनी नायडूंकडून कौशल्य शिकलं पाहिजे, पंतप्रधान मोदींचे आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्रदयस्पर्शी भाषणानंतर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खर्गे आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनीसुद्धा नायडू यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळावर प्रकाश टाकला.

Farewell to Naidu : व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेत निरोप, तरुणांनी नायडूंकडून कौशल्य शिकलं पाहिजे, पंतप्रधान मोदींचे आवाहन 
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेत निरोप देण्यात
| Edited By: | Updated on: Aug 08, 2022 | 6:21 PM

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना निरोप दिला. तुमचा प्रत्यक्ष शब्द ऐकला जातो. पसंत केला जातो. त्याचा आदर केला जातो. त्याला कधीही विरोध केला गेला नाही, असं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं. तरुणांनी नायडू यांच्याकडून कौशल्य (Skills) शिकलं पाहिजे, अशा शब्दात नायडूंना गौरव केला. भावपूर्ण शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना निरोप दिला. व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपतीपदाचा बुधवारी संपत आहे. त्यांना संसदेत (Parliament) सोमवारी निरोप समारंभ देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन (Guidance) करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.

सार्वजनिक जीवनात मार्गदर्शन मिळत राहील

पंतप्रधान मोदी म्हणाले, सभागृहाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी संपत आहे. परंतु, सार्वजनिक जीवनात तुमचे मार्गदर्शन मिळत राहील. नायडू यांनी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. कोणतंही काम त्यांच्यासाठी ओझं नव्हतं. त्यांना मी अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आहे.

सुधारणा करण्यासाठी नेहमी अग्रेसर राहायचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्रदयस्पर्शी भाषणानंतर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खर्गे आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनीसुद्धा नायडू यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळावर प्रकाश टाकला. मल्लीकार्जुन खर्गे म्हणाले, त्यांना बराच अनुभव आहे. सुधारणा करण्यासाठी ते नेहमी सक्रिय असायचे. गेल्या ३०-४० वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. व्यंकय्या नायडू हे कर्नाटकाचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते. शिवाय सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलंय. दक्षिणेकडील राज्यातून नायडू हे तिसरे उपराष्ट्रपती झाल्याचं यावेळी खर्गे यांनी सांगितलं. आम्ही विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय असल्याचं ते म्हणाले. आपणानंतर राज्यसभेत कोणत्या प्रकारचं वातावरण राहीलं. आम्हाला माहीत नाही. नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची निवड झाली आहे. नायडू यांच्यानंतर ते उपराष्ट्रपतीपदाचा कारभार पाहतील. जगदीप धनखड यांनी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला.