Pune Corona : पुण्यात एकाच दिवसात 14 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
पुण्यात शनिवारी (13 जून) एकाच दिवसात तब्बल 14 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला (Corona Patient Death Pune) आहे.
पुणे : पुण्यात शनिवारी (13 जून) एकाच दिवसात तब्बल 14 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला (Corona Patient Death Pune) आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत 439 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात 254 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या 9 हजार 336 वर पोहोचली (Corona Patient Death Pune) आहे.
पुण्यात शनिवारी दिवसभरात 163 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 6 हजार 87 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 810 अॅक्टिव्ह रुग्ण असून क्रिटिकल 208 आणि 47 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
पुण्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत. मात्र पुण्यातील मृत्यूदर आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील मृत्यूदर हा राज्यापेक्षा आणि देशापेक्षा सर्वाधिक आहे. या मृत्यूदरात सातत्याने वाढ होत असल्याने पुणेकरांची चिंता कायम आहे.
त्यातच शनिवारी (13 जून) एका दिवसात पुण्यात 14 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. पुण्याचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यूदर पेक्षा सर्वाधिक आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख 4 हजार 568 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 3 हजार 830 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 49 हजार 346 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
संबंधित बातम्या :
Corona Special Report :पुण्याचा मृत्यूदर जास्त, तरी पुणेकर बिनधास्त?
Pune Death Rate | पुण्याचा मृत्यूदर घसरला, मात्र तरीही राज्य आणि देशापेक्षा जास्तच