उद्यापासून पुण्यात रस्त्यावर थुंकल्यास 150 रुपये दंड
[wpvp_player src=http://tv9marathi.com/wp-content/uploads/2018/11/pune-women-gang.mp4 width=640 height=360 splash=http://tv9marathi.com/wp-content/uploads/2018/11/default_image.jpg]पुणे : स्वच्छ भारत अभियान सुरु असतानाच आता पुणे महानगरपालिकेकडून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आणि थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत रस्त्यावर कचरा टाकल्यास 100 रुपये, तर थुंकल्यास 150 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. या नियमाची अंमलबाजावणी उद्यापासून करण्यात यावी, असे आदेश पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत. ही कारवाई बसस्थानक, […]
[wpvp_player src=https://www.tv9marathi.com/wp-content/uploads/2018/11/pune-women-gang.mp4 width=640 height=360 splash=https://www.tv9marathi.com/wp-content/uploads/2018/11/default_image.jpg]पुणे : स्वच्छ भारत अभियान सुरु असतानाच आता पुणे महानगरपालिकेकडून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आणि थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत रस्त्यावर कचरा टाकल्यास 100 रुपये, तर थुंकल्यास 150 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. या नियमाची अंमलबाजावणी उद्यापासून करण्यात यावी, असे आदेश पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत. ही कारवाई बसस्थानक, पान टपरी, चहाची टपरी तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी करण्यात येईल.
नुकत्याच झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात इंदूर ‘सेव्हन स्टार’ तर पुणे ‘थ्री स्टार’ ठरले. स्मार्ट सिटीमध्ये तर पुण्याने पहिला क्रमांक गाठला आहे. मागील काही रिपोर्ट्समध्ये स्वच्छ भारत सर्वेक्षण 2016-17 च्या यादीत पुणे शहर 13 व्या क्रमांकावर होते. तर 2015-16मध्ये ते 11 व्या स्थानावर होते. 2015-16च्या तुलनेत पुणे शहर 2016-17 मध्ये 11 व्या स्थानावरुन थेट 13 व्या स्थानावर घसरले दिसत आहे. कदाचित या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून हे पाऊल उचलण्यात आले असावे.
“स्वच्छ भारत अभियानामध्ये पुणे शहराला मोठा पल्ला गाठावा लागेल. इंदूरसारखे शहर सेव्हन स्टार सिटी बनले असून पुण्याचा क्रमांक थ्री स्टारपर्यंत येत आहे”, असे मत गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी मांडले.
दिवसेंदिवस वाढत चाललेली शहराची लोकसंख्या यामुळे कचऱ्यांची समस्या उद्भवत आहे. यावर आळा बसविण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या पुणे महापालिकेच्या कारवाईवर पुणेकर कशा प्रकारे प्रतिसाद देतील हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.