Pune corona death | पुण्यात ‘या’ वयोगटातील तब्बल 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनही घोषित करण्यात (Senior Citizen Death due to corona Pune) आले आहे.

Pune corona death | पुण्यात 'या' वयोगटातील तब्बल 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 6:42 PM

पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनही घोषित करण्यात (Senior Citizen Death due to corona Pune) आले आहे. कोरोनामुळे देशासह राज्यात अनेकांचे मृत्यू झाले आहे. पुणे जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. पुण्यात जिल्ह्यात आतापर्यंत 61 ते 90 वयोगटातील 80 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात एकूण 161 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. पुण्यात आज (12 मे) दिवसभरात एकूण तीन कोरोनाबाधित रुग्णांचा (Senior Citizen Death due to corona Pune) मृत्यू झाला आहे.

पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा 61 ते 70 या वयोगटातील रुग्णांना बसला आहे. या वयोगटातील तब्बल 52 रुणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 51 ते 60 वयोगटातील 39 रुग्णांचा, 71 ते 80 वयोगटातील 23 रुग्णांचा, 81 ते 90 या वयोगटात केवळ पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

त्याशिवाय 41 ते 50 वयोगटातील 22 रुग्णांचा, 31 ते 40 वयोगटात 11 रुग्णांचा, 21 ते 30 वयोगटात 2 रुग्णांचा, 11 ते 20 आणि 10 ते 0 वयोगटात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

पुणे जिल्ह्यात दहा तारखेपर्यंत 156 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूमध्ये सर्वाधिक जास्त रुग्ण हे 61 ते 70 वयोगटातील आहेत. या वयोगटातील मृतांचं प्रमाण हे 33 टक्के आहे. 51 ते 60 वयोगटातील मृतांचं प्रमाण 25 टक्के, 71 ते 80 या वयोगटातील मृतांचं प्रमाण 15 टक्के, 41 ते 50 या वयोगटातील मृतांच प्रमाण 14 टक्के, 31 ते 40 या वयोगटातील मृतांचं प्रमाण सात टक्के आहे.  81 ते 90 या वयोगटातील मृतांचं प्रमाण तीन टक्के आहे. तर 21 ते 30 या वयोगटात मृतांचं प्रमाण एक टक्के आहे. अकरा ते वीस आणि दहा ते शून्य या वयोगटात मृतांचं प्रमाण एक टक्के आहे.

मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. 156 पैकी 65 कोरोनाबाधित महिला मयत असून हे प्रमाण 42 टक्के आहे. तर 91 कोरोना बाधित पुरुष मयत असून हे प्रमाण 58 टक्के आहे. पुण्यात आतापर्तंय 3105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

पुणे क्षेत्रिय कार्यालयनिहाय कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या (11 मे 2020)

1) भवानी पेठ : 511 2) ढोले पाटील : 409 3) शिवाजीनगर-घोले रोड : 326 4) कसबा-विश्रामबाग : 319 5) येरवडा-कळस-धानोरी : 294 6) बिबवेवाडी : 145 7) धनकवडी-सहकारनगर : 135 8) वानवडी : 132 9) नगररोड : 65 10) हडपसर : 64 11) कोंढवा : 34 12) वारजे-कर्वेनगर : 15 13) सिंहगड रोड : 15 14) औंध-बाणेर : 5 15) कोथरुड-बावधन : 4

संबंधित बातम्या : 

नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा, बाधितांचा आकडा 693 वर

भवानी पेठेत कोरोनाचा कहर, 500 च्या वर कोरोनाबाधित रुग्ण

पुण्याच्या विषाणू संस्थेचे मोठे संशोधन, अँटीबॉडी तपासण्याचे किट विकसित

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.