वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढणारे अभिजित बिचुकले आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले होते. | Abhijeet Bichukale

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढणारे अभिजित बिचुकले आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 9:10 AM

पुणे: राष्ट्रपतीपद, लोकसभा आणि विधानसभा अशा जवळपास प्रत्येक निवडणुकीत आपले नशीब आजमावून झालेले ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले (abhijeet bichukale) यांनी आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अभिजित बिचुकले यांनी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर राज्यात पुन्हा एकदा अभिजित बिचुकले यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. (Big boss marathi fame Abhijeet Bichukale will contest teacher and graduate constituency election 2020 from Pune)

कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे अभिजित बिचुकले त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. त्यामुळे यंदा पुणे पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. मी प्रत्येक निवडणुकीत का हरतो, याचे उत्तर जनतेने द्यायला पाहिजे. माझा चाहतावर्ग मला कायम पाठिंबा देतो. मात्र, पैसा आणि सत्तेच्या ताकदीपुढे माझी चिकाटी कमी पडते. त्यामुळे आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये माझा पराभव झाला. मात्र, आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी माझा गांभीर्याने विचार करावा. मी तरुणांच्या शिक्षण आणि नोकऱ्यांच्या मुद्द्यांना प्राधान्य देईन. मतदारांनी मला एकदा संधी देऊन पाहावी, असे आवाहन अभिजित बिचुकले यांनी केले.

यापूर्वी अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तर गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले होते. मात्र, शिवसेनेच्या झंझावातापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. या निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

पुण्यात मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरेंना उमेदवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्या रुपाली पाटील यांना विधानसभेला दिलेला शब्द पाळला आहे. राज ठाकरे यांनी मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून अ‌ॅ.ड रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

खुद्द राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रुपाली पाटील या पक्ष स्थापनेपासून (14 वर्षांपासून) मनसेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या निष्ठेचं आणि कामाचं फळ त्यांना मिळालं आहे.

संबंधित बातम्या:

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाची उडी

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रबळ दावेदाराची माघार

(Big boss marathi fame Abhijeet Bichukale will contest teacher and graduate constituency election 2020 from Pune)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.