Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा, पुढचे कार्यक्रम अकरानंतर घेत जा, आव्हाडांच्या मागणीवर अजित पवारांचे चिमटे

यापुढचे कार्यक्रम अकरा नंतर घेतलेत, तर आमची झोप पूर्ण होत जाईल. प्रवासाचा वेळही तेवढा कमी होईल, असं जितेंद्र आव्हाड अजित पवारांना म्हणाले.

दादा, पुढचे कार्यक्रम अकरानंतर घेत जा, आव्हाडांच्या मागणीवर अजित पवारांचे चिमटे
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 12:31 PM

पुणे : दादांचा जेवढा उरक आहे, तेवढा आमचा नसेल. त्यामुळे पुढचे कार्यक्रम अकरानंतर घेतलेत तर बरं होईल, असं आर्जव गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केलं. त्यावर जरा लवकर उठण्याची सवय करुन घ्या, असं म्हणत अजित पवारांनी चिमटे (Ajit Pawar Suggests Jitendra Awhad) काढले.

‘दादांचा जेवढा उरक आहे, तेवढा आमचा नसेल कदाचित. कारण दादांनी लावला सकाळी 10 वाजता कार्यक्रम. मी निघालो ठाण्याहून. काल रात्रीचा माझा कार्यक्रम. कारण मी बंगल्यावरच बसतो दहा-अकरा वाजेपर्यंत. तेव्हा दादा, जरा यापुढचे कार्यक्रम अकरा नंतर घेतलेत, तर आमची झोप पूर्ण होत जाईल. प्रवासाचा वेळही तेवढा कमी होईल’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘तुम्हाला झोप लागते पाच तास. आम्हाला लागते सहा-सात तास. तेवढा आमचाही जरा विचार करा’ असं आव्हाड मिष्किलपणे म्हणाले. पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यलयाचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा : हा सकाळी लवकर शपथ घेत असतो; नाशिकच्या थंडीत भल्या पहाटे अजित पवारांची टोलेबाजी

जितेंद्र आव्हाडांच्या विनंतीला अजित पवारांनीही गमतीने उत्तर दिलं. ‘जितेंद्रजी, परवा मी नाशिकमध्ये मीटिंग घेतली, ती सकाळी सात वाजता. थंडीमध्ये नरहरी झिरवळसहित सगळे फुल, याच्यापेक्षा 25 पट लोकं होती. माहिती आहे तिथं… मी सांगतोय. टीव्हीला पण आलं. सुरुवात आपल्या इथं सुर्यमुखी असलेल्यांनी जरा लवकर उठलं ना, की सगळी काम लवकर होतात’ असं अजित पवार म्हणाले.

‘गमतीचा भाग जाऊ द्या, पण शरद पवार साहेबांचं राजकारण समाजकारण जवळून पाहिलेलं. पवार साहेब मुख्यमंत्री असताना कधी रात्री दोन वाजता झोपायचे, तरी सकाळी सातला तयार असायचे. ती जी सवय लागली. ती कायमची लागली, तशी सवय तू पण लावून घेतली, तर बरं होईल. सात वाजता निघायचं नाही, कामाला लागायचं. त्यासाठी तिथनं चारला निघाला असतास, तर इथे सातला पोहचला असतास’ अशा कानपिचक्याही अजित पवारांनी (Ajit Pawar Suggests Jitendra Awhad) लगावल्या.

नाशिक दौऱ्यावर असतानाही अजित पवारांनी सकाळी सात वाजताच भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावत आयोजकांची तारांबळ उडवली होती. काही जण चर्चा करत होते, मी सकाळी इतक्या लवकर येईन का, त्यावर दुसरा म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस.
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.