महिनाभर अॅम्ब्युलन्सने कोरोना रुग्णांची ने-आण, बर्थडेला आलेल्या पगारातून मास्कवाटप, चालकाचं दातृत्व

महिन्याच्या पगारातून गरजूंना 1 हजार मास्कचं वाटप, मारुती जाधव या रुग्णवाहिका चालकाने केलं आहे. (Pimpri Ambulance driver distributes mask)

महिनाभर अॅम्ब्युलन्सने कोरोना रुग्णांची ने-आण, बर्थडेला आलेल्या पगारातून मास्कवाटप, चालकाचं दातृत्व
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 12:55 PM

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डॉक्टर ,नर्स ,पोलीस यांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व योद्धे (Pimpri Ambulance driver distributes mask) आपली सेवा बजावत आहेत. यातील महत्त्वाचा घटक म्हणजे रुग्णवाहिका अर्थात अॅम्ब्युलन्स चालक. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अॅम्ब्युलन्सचालक आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणणे आणि उपचारानंतर त्यांना घरापर्यंत सोडणे हे महत्त्वाचं काम अॅम्ब्युलन्सचालक करत आहेत. पिंपरी चिंचवडमधील एक अॅम्ब्युलन्सचालकही हे काम नित्यनियमाने करत आहेच, पण त्यांनी सामाजिक भानही जपलं आहे. महिन्याच्या पगारातून गरजूंना 1 हजार मास्कचं वाटप, एका रुग्णवाहिका चालकाने केलं आहे. (Pimpri Ambulance driver distributes mask)

मारुती जाधव असं या रुग्णवाहिका चालकाचं नाव आहे. त्यांनी आपल्या वाढदिवानिमत्त मास्कवाटप केलं. मारुती जाधव हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील एका रुग्णवाहिकेवर चालक आहेत. मास्कचं वाटप केलं हे इतरांच्या दृष्टीने तितकंच महत्त्वाचं नसेलही. पण दीड महिन्यांपासून कोरोनारुग्णांची ने-आण करुन मारुती जाधव यांनी आपलं कर्तव्य तर बजावलंच, पण मिळालेल्या पगारातून त्यांनी गरजूंना मास्कचं वाटप करुन, सामाजिक बांधिलकी जपली.

मारुती जाधव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील रुग्णालयात गेल्या पाच वर्षापासून रुग्णवाहिका चालकाचे कर्तव्य बजावत आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च न करण्याचा निर्णय घेऊन, त्यांनी विविध परिसरातील गरजू नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मास्कचे मोफत वाटप केले.

यामध्ये वायसीएम रुग्णालय, संभाजी नगर, चिखली, घरकुल, चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी, पोलीस मित्र आणि वृद्ध नागरिकांना स्वसरंक्षणासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.

मारुती हे दीड महिन्यापासून कोरोनाणा रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आणि या मुक्त झालेल्या रुग्णांना आपल्या घरी पोहोचवण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.