भीमा कोरेगावला भीम आर्मी आणि ब्राह्मण महासंघ आमनेसामने?
पुणे : भीमा कोरेगावला क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भीम आर्मीने राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचं आयोजन केलंय. या महासभेला भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद पुण्यात येणार आहेत. 30 डिसेंबरला एसएसपीएमएस कॉलेज मैदानावर महासभा पार पडणार आहे. तर 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंबेडकरी तरुणाईशी संवाद […]
पुणे : भीमा कोरेगावला क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भीम आर्मीने राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचं आयोजन केलंय. या महासभेला भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद पुण्यात येणार आहेत. 30 डिसेंबरला एसएसपीएमएस कॉलेज मैदानावर महासभा पार पडणार आहे. तर 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंबेडकरी तरुणाईशी संवाद साधला जाणार आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमाची तयारी सुरु असून पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. मात्र या कार्यक्रमाला पोलिसांनी अजून परवानगी दिली नाही. परवानगी दिली नाही तरी महासभा होणार असल्याचं जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी सांगितलंय.
राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेवर नियंत्रणाची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलीय. विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र एखाद्या समाजाविरोधात जहाल वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटते हे आपण पहिलंय. त्यामुळे यंदा महासभेवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केलीय. गेल्या वर्षी प्रमाणे यंदा दुर्दैवी घटना घडणार नाही. याची दक्षता घेण्याचं अवाहन ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी केलंय.
आरक्षण आर्थिक निकषावर असावं ही आमची भूमिका असल्याचं दवे यांनी म्हटलंय. मराठा समाजाच्या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो. काही काळाने आरक्षणाचा काय फायदा झाला याचा आढावा घेऊन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय फरक पाहावा, फरक पडला असल्यास अन्यथा नसल्यास काही काळाने आरक्षण रद्द करुन ते समाजातील आर्थिक गरजूंना देण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली.
दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांचे पुतळे उभारण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केलीय. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा उभारण्यासाठी मनपाने जागा द्यावी. आम्ही स्वखर्चाने पुतळा बसवू, तर राम गणेश गडकरी यांचा पुतळा मनपाने त्वरीत त्या जागी बसवण्याची मागणी दवे यांनी केलीय. पुतळा पूर्वी तिथेच असल्याने परवानगी ठरावाची गरज नसल्याचं दवे यांनी म्हटलंय.