पुणे लोकसभा: भाजपकडून जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ चर्चेत
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीसाठी वडगावशेरीचे भाजप आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समिती माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहळ यांचं नाव आघाडीवर आहे. भाजप अंतर्गत सर्व्हेनंतर ही नावं पुढं आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेसाठी आतापर्यंत विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे आणि राज्याचे मंत्री गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा […]
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीसाठी वडगावशेरीचे भाजप आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समिती माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहळ यांचं नाव आघाडीवर आहे. भाजप अंतर्गत सर्व्हेनंतर ही नावं पुढं आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभेसाठी आतापर्यंत विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे आणि राज्याचे मंत्री गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा होती. त्याचबरोबर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचंही नाव पुढे आले होतं. मात्र आता जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहळ यांच्या नावाच्या चर्चाने भाजपचा पुण्यातील गुंता वाढताना दिसत आहे.
कोण आहेत जगदीश मुळीक?
जगदीश मुळीक हे सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत.
मुळीक 2014 मध्ये वडगावशेरी मतदारसंघात विजयी झाले.
2014 चा निकाल
सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल शिरोळे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता. सध्या विश्वजीत कदम हे वडील पतंगराव कदम यांच्या जागी विधानसभा पोटनिवडणुकीत सांगलीतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी यावेळी काँग्रेसकडून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पुण्यात नेमकं तिकीट कुणाला मिळतं आणि कुणाविरोधात कोण लढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणूक 2014
पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 21 मतदार संघ आहेत. त्यापैकी भाजपचे 11, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचा 1, मनसेचा 1, रसपचा 1 आणि अपक्ष 1 असे आमदार निवडून आले होते. पुढे अपक्ष भाजपाला जाऊन मिळाला.
संबंधित बातम्या
लोकसभा निवडणूक : पुणे जिल्ह्याचं राजकारण निर्णायक ठरणार!