“फील्डवर छान काम, आता काळजी घ्या” पुण्याचे कोरोनाग्रस्त महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्र्यांचा फोन

शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असले, तरी कोरोनाच्या संकटकाळात राजकीय चेहऱ्यापलिकडे असलेल्या माणुसकीचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घडवले.

फील्डवर छान काम, आता काळजी घ्या पुण्याचे कोरोनाग्रस्त महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्र्यांचा फोन
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 12:49 PM

पुणे : कोरोनाची लागण झालेले पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला. मोहोळ यांच्या प्रकृतीची उद्धव ठाकरे यांनी विचारपूस केली. (CM Uddhav Thackeray calls Corona Positive Pune Mayor Muralidhar Mohol)

काळजी घेऊन लवकर बरं होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. फील्डवर काम करत असल्याबद्दल कौतुक केलं. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असले, तरी कोरोनाच्या संकटकाळात राजकीय चेहऱ्यापलिकडे असलेल्या माणुसकीचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घडवल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नगरसेवक असलेले मोहोळ थेट मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे हरखून गेले.

मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी (4 जुलै) सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावली होती. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापौरांवर मोठी जबाबदारी आहे.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

लातूरमधील औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार, पुण्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नी, हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन, नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण, मुलालाही संसर्ग

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर माजी महापौर आणि विद्यमान भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या मातोश्री यांनाही कोरोना झाला आहे.

याशिवाय नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

पहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या:

उद्धव काकांचं ऐकणार की नाही? आईचा चिमुकलीला दम, तर शिवसैनिकांना का त्रास देताय? मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन

दोन्ही डोळ्यांनी अंध, 2 महिन्यात एकही रजा नाही, सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल करुन मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

दत्ता, तुम्हा सर्वांच्या भरवश्यावर करतोय, तुम्ही काळजी घ्या, पुण्यातील सरपंचाला थेट उद्धव ठाकरेंचा कॉल

(CM Uddhav Thackeray calls Corona Positive Pune Mayor Muralidhar Mohol)

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.